Home » मनोरंजन » लोकप्रिय मराठी अभिनेत्रीच्या घरी सनईचे सूर! होणारा नवराही सिनेविश्वातलाच, लग्नगाठ कधी बांधणार?

लोकप्रिय मराठी अभिनेत्रीच्या घरी सनईचे सूर! होणारा नवराही सिनेविश्वातलाच, लग्नगाठ कधी बांधणार?

Facebook
Twitter
WhatsApp
78 Views

लोकप्रिय मराठी अभिनेत्रीच्या घरी सनईचे सूर! होणारा नवराही सिनेविश्वातलाच, लग्नगाठ कधी बांधणार?

 

गेल्या काही महिन्यांपासून मराठी मनोरंजनविश्वात लग्नसराई सुरु आहे. अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले. अनेकांनी आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केलीय. काही कलाकारांच्या घरी सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत.

मालिका, सिनेमांमधून दिसणाऱ्या आवडत्या कलाकारांचे खऱ्या आयुष्यातील लग्नसोहळे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या स्टार प्रवाहच्या मालिकेतील अभिनेत्रींच्या घरी लग्नाची लगबग सुरु झालीय. अभिनेत्री साक्षी महाजनच्या (Sakshi Mahajan) लग्नाची सध्या चाहत्यांमध्ये एकच चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वीच साक्षीने सोशल मीडियावर होणाऱ्या नवऱ्यासोबत रोमँटिक फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमीची दिली होती. आता तिच्याकडे जोरात केळवणं सुरु झाली आहेत. लग्नपूर्व विधींना सुरुवात झालीय. अभिनेत्री साक्षी महाजन कोणाशी लग्न करतेय? कधी आहे तिचा लग्नसोहळा याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

नुकताच अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरच्या साखरपुड्याची लगबग होती. लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतील अभिनेता सिद्धार्थ खिरिडही नुकताच लग्नबंधनात अडकल्यानंतर अभिनेत्री साक्षी महाजनच्या लग्नाची चर्चा आहे.स्टार प्रवाहवरील ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या मालिकेतील अभिनेत्री साक्षी महाजन हिचं विद्या हे पात्र घरारात चांगलंच लोकप्रिय झालं. आता अभिनेत्री आपल्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या पर्वाकडे वळतीय. तिच्या लग्नाला तीन दिवस राहिले आहेत.अभिनेत्री साक्षी महाजन अथर्व कर्वेसोबत लग्नबेडीत अडकणार आहे.

कोण आहे साक्षीचा होणार नवरा?

अभिनेत्री साक्षी महाजनने अलीकडेच मराठी व हिंदी मालिकांमध्ये काम करणारा अभिनेता अथर्व कर्वे याच्यासोबत लग्न करणार असल्याचं सांगत त्यांचे रोमँटिक फोटो शेअर केलेले. अथर्व कर्वे हा लोकप्रिय अभिनेता असून त्याने ‘बालगंधर्व’, ‘हरिश्चन्द्रची फॅक्टरी’ यासारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलंय. शिवाय तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेतही झळकला होता. अथर्व आणि साक्षी गेल्या अनेक महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. नुकताच दोघांचं दणक्यात केळवण झालं. अलीकडेच साक्षीने घाणा आणि बांगड्या भरण्याचा कार्यक्रम पार पाडला आहे. या सोहळ्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले. दरम्यान, तिचा होणारा पती अथर्व कर्वेने मित्रांनी पोस्ट केलेल्या काही स्टोरीज रि-शेअर केल्या आहेत. त्यापैकी एका मित्राने ‘3 days to go…’ असा मजकूर असलेली स्टोरी शेअर करत साक्षी-अथर्वच्या लग्नाची चाहत्यांना सूचक माहिती दिली आहे. हे जोडपं येत्या ६ फेब्रुवारीला लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!