Home » गुन्हा » व्हिडीओ व्हायरलची धमकी देत महिलेवर सामूहिक अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, आकाेल्यातील धक्कादायक प्रकार!

व्हिडीओ व्हायरलची धमकी देत महिलेवर सामूहिक अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, आकाेल्यातील धक्कादायक प्रकार!

Facebook
Twitter
WhatsApp
46 Views

व्हिडीओ व्हायरलची धमकी देत महिलेवर सामूहिक अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, आकाेल्यातील धक्कादायक प्रकार!

 

अकोला: अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत एका विवाहित महिलेवर वारंवार बलात्कार करून तिचे शारीरिक व मानसिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार अकोल्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणात पीडित महिलेला धर्मांतरासाठीही सातत्याने दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप असून, सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून एक आरोपी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.

डाबकी रोड परिसरात राहणारी व ब्युटी पार्लर चालवणाऱ्या एका विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून हा प्रकार समोर आला. फिर्यादी महिला गांधी रोड परिसरात, खंडेलवाल ज्वेलर्स शेजारी असलेल्या ‘परी बिंदी घर’ या दुकानात सौंदर्यप्रसाधन साहित्य खरेदीसाठी नियमित जात होती. नवीन साहित्य उपलब्ध झाल्यावर माहिती देण्याच्या बहाण्याने दुकान संचालकाने तिचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर विविध कारणांनी संपर्क साधत आरोपीने हळूहळू तिचा विश्वास संपादन केला.

एका दिवशी दुकानात कोणी नसल्याची संधी साधून आरोपीने फिर्यादी महिलेशी अश्लील कृत्य केले व त्याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला दगडी पूल परिसरातील एका फ्लॅटवर नेऊन जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले, असे तक्रारीत नमूद आहे. यानंतर आरोपीने शारीरिक संबंधांचेही व्हिडीओ तयार करून ठेवले. या व्हिडीओंच्या आधारे महिलेला ब्लॅकमेल करत पैशांची मागणी करण्यात आली तसेच आपल्या साथीदारांसोबतही जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवण्याचा दबाव टाकण्यात आला. हा छळ दीर्घकाळ सुरू असल्याचे फिर्यादीने आपल्या जबाबात नमूद केले आहे.

दरम्यान, आरोपीच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यामध्ये अनेक महिलांचे अश्लील फोटो व व्हिडीओ आढळून आले. यामध्ये फिर्यादीच्या ओळखीतील एका महिलेचाही समावेश असून, तिनेही आपले अशाच प्रकारे शोषण झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा आवाका अधिक व्यापक असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. फिर्यादी महिलेच्या म्हणण्यानुसार, अश्लील व्हिडीओ डिलीट करून देण्याच्या बदल्यात आरोपींकडून सातत्याने धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात येत होता.

बदनामीची भीती, मानसिक तणाव आणि वाढत्या दबावामुळे अखेर महिलेने धाडस करत सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रहेमान उर्फ मोहम्मद मुस्तफा मोहम्मद सलीम तेली, चंदू राजू वानखेडे आणि इमरान गॅरेजवाला यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून तिसरा आरोपी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात सिटी कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक संजय गवई करीत आहेत. सिटी कोतवाली पोलिस करीत आहेत.

एका आरोपीचा संशय

फिर्यादी महिलेच्या जबाबानुसार तिच्या शोषणात चार जणांचा सहभाग असल्याचा संशय आहे. मात्र, सध्या पोलिसांनी तीनच आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. चौथा संशयित कोण आहे, त्याची भूमिका काय होती आणि त्याच्यावर गुन्हा केव्हा दाखल होणार, याबाबत तपास सुरू आहे.

अनेक महिलांचे शोषण

आरोपीच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे अश्लील फोटो व व्हिडीओ आढळून आल्याने, तपास अधिक खोलवर गेल्यास आणखी पीडित महिलांची नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी सुरू असून त्यातून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!