टेन्शन देणार बातमी! या नागरिकांचे रेशन कार्ड कायमचे बंद; मिळणार नाही लाभ; तुमचंही नाव आहे का?
शन कार्ड हे महत्त्वाचे कागदपत्र आहे. रेशन कार्डद्वारे लाभार्थ्यांना दर महिन्याला ५ किलोपर्यंत अन्नधान्य मोफत मिळते.
अनेकजण दर महिन्याला लाभ घेतात. अनेकजण हे अन्नधान्य घेत नाही. सोलापूरातील तब्बल २२८०० लाभार्थ्यांनी वर्षभर धान्यच घेतले नाही. त्यामुळेच पुरवठा निरीक्षक आणि तलाठ्यांमार्फत मिशन पडताळणी सुरु केली आहे.
आयुष्यभराचा विमा
रेशन कार्ड बंद होण्याची कारणे
या रेशन कार्डधारकांपैकी अनेकांनी आर्थिक स्थिती सुधारली आहे त्यांना या धान्याची गरज नाही. अनेकजण स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे या महिलांना लाभाची गरज नाही. या महिलांचा लाभ कायमचा बंद होणार आहे.
रेशन कार्ड आणि आधार कार्ड अनिवार्य करण्यास सांगितले होते. त्यावेळी रेशन दुकानदारांनी अंदाजे जन्मतारीख टाकली होते. त्यामुळे अनेकांचे वय खूप जास्त दाखवत होते तर काहींचे वय १८ पेक्षा कमी असल्याचे दाखवत आहे. याचीही पडताळणी केली जाणार आहे. या गोंधळामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
याचसोबत अनेक लाभार्थी स्थलांतिक झाले आहेत. त्यातील काही लोकांनी पत्ते बदलले आहेत त्यामुळे त्यांचा लाभ बंद होणार आहे. ज्या रेशनकार्डधारकांनी सहा ते १२ महिन्यांपासून योजनेचा लाभ घेतला नाही अशा लोकांची पडताळणी केली जाणार आहेत. यातील अपात्र लाभार्थ्यांचे रेशन कार्ड कायमचे बंद केले जाणार आहे.






