Home » राजकारण » राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड होणार; हालचालींना वेग, नेमकं काय काय घडतंय?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड होणार; हालचालींना वेग, नेमकं काय काय घडतंय?

Facebook
Twitter
WhatsApp
64 Views

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड होणार; हालचालींना वेग, नेमकं काय काय घडतंय?

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवड पुढल्या एक महिन्याच्या आधी करण्याच्या हालचाली सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे.

अर्थसंकल्प अधिवेशन कालावधीतच राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष निवडणूक पार्टी अंतर्गत करण्याच्या हालचाली सुरु आहेत. पार्टीचे पत्र राज्यातील पदाधिकारी तसंच राष्ट्रीय कार्यकारिणी पदाधिकारी यांच्या सहमतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड बिनविरोध होणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या निधनानंतर 31 जानेवारीला सुनेत्रा पवार यांनी उपमु्ख्यमंत्रिपदाची शपथ  घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांनी केलेल्या दाव्याप्रमाणे सुनेत्रा पवार यांनी शपथ घेण्यापूर्वी पवार कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांना निरोप दिला होता. अपघातानंतर नरेंद्र मोदींचा सांत्वनपर फोन सुनेत्रा पवारांना आला होता. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाविषयी प्रस्ताव शरद पवारांच्या गटाकडून अजित पवारांकडे येत होते. शरद पवारांच्या पक्षाकडून येणारे प्रस्ताव अजित पवारांनी पक्षात वरिष्ठ वर्तुळात सांगितले. एकत्रीकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मत जाणून घेण्याचे अजित पवारांच्या पक्षाने आवश्यक समजले. एकत्रीकरणाच्या प्रस्तावावर अजित पवार आणि प्रफुल पटेल, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी चर्चा करणार होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उच्चपदस्थ सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी चर्चा झालेली नव्हती. भविष्यातील सर्व निर्णय सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते घेणार असं त्यांचं म्हणणं आहे. लवकरच सुनेत्रा पवार दिल्लीत नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेतील

सुनेत्रा पवार यांना पक्षाचे अध्यक्ष बनवा, पक्षातील नेत्यांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड करा, अशी मागणी आमदारांकडून करण्यात आल्यानंतर आता पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही ही मागणी उचलून धरली आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या  अंतर्गत गोटात हालचाली सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात पक्षातील 30 हून अधिक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पक्षाचे अध्यक्ष बनवा, अशी मागणी केली आहे. त्यांनी हे पत्र सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना पाठवले आहे.

अजित पवारांचं विमान अपघातात निधन-

अजित पवार (Ajit Pawar Plane Crash) यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं. 28 जानेवारीला अजित पवार खाजगी विमानाने सकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. यावेळी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान सकाळी 8.46 वाजता विमानाचा अपघात झाला होता. यामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या अकाली मृत्यूमुळे राज्याच्या सर्वच स्तरात दुःखाची लाट उसळली.  लाखो चाहते, समर्थक, सर्वपक्षीय नेते यांच्या उपस्थितीत 29 जानेवारीला अजित पवारांवर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!