Home » गुन्हा » फोन केला की बस स्थानकात भेट, मुख्याध्यापकाची धमकी, सातवीतील मुलीवर कारमध्ये अत्याचार; रात्री 11 वाजता कॉल आला अन्…

फोन केला की बस स्थानकात भेट, मुख्याध्यापकाची धमकी, सातवीतील मुलीवर कारमध्ये अत्याचार; रात्री 11 वाजता कॉल आला अन्…

Facebook
Twitter
WhatsApp
36 Views

फोन केला की बस स्थानकात भेट, मुख्याध्यापकाची धमकी, सातवीतील मुलीवर कारमध्ये अत्याचार; रात्री 11 वाजता कॉल आला अन्…

 

यवतमाळ : घाटंजी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने एका सातवीतील विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना रविवारी समोर आली. या प्रकरणी दाखल तक्रारीवरून मुख्याध्यापक किशोर मालवीय (५०) याच्याविरुद्ध पोक्सोसह विविध कलमांखाली गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे.

काय घडलं नेमकं?

मुख्याध्यापक मालवीय हा सदर अत्याचारग्रस्त विद्यार्थिनीला नेहमी त्रास देत होता. बोलवेल तेव्हा भेटायला यावेच लागेल म्हणून धमकावत होता. ५ फेब्रुवारी रोजी त्याने विद्यार्थिनीला धमकावत ‘मी तुला फोन करेल तेव्हा गावच्या बस स्थानकावर रात्री भेटायला ये. ही गोष्ट घरी सांगितली तर तुला जीवे मारेन,’ असे म्हटले होते. त्याने रात्री ११ वाजताच्या सुमारास विद्यार्थिनीच्या वडिलांच्या मोबाइलवर फोन केला. मोबाइल विद्यार्थिनीकडे असल्याने ती घाबरत रात्री बसस्थानकावर गेली. मुख्याध्यापक तेव्हा आपल्या चारचाकी वाहनात बसलेला होता. त्याने परिस्थितीचा फायदा घेऊन विद्यार्थिनीवर वाहनातच अत्याचार केला.

काही महिन्यांपूर्वीही मुख्याध्यापकाकडून अत्याचार

घाबरलेल्या विद्यार्थिनीने कशी तरी त्याच्या तावडीतून सुटका करून घर गाठले. विद्यार्थिनीने घरी आल्यावर घरच्यांना रडत सर्व घटना सांगितली. त्यानंतर ७ फेब्रुवारीला मुलीच्या वडिलांनी पोलिस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. मुख्याध्यापकाने यापूर्वीही मे २०२५ मध्ये या विद्यार्थिनीला शाळेच्या डिजिटल खोलीत बोलावून अत्याचार केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

आरोपी कोठडीत, कार जप्त

घाटंजी पोलिसांनी तक्रार प्राप्त होताच अटकेसाठी पथक पाठवून यवतमाळ येथून आरोपी मुख्याध्यापकाला ताब्यात घेतले. त्याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या ६४ (२), एफ.एम. ६५ (१), ३५१ (३) कलमान्वये तसेच सहकलम ४ (६) पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीला २१ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीने घटनेत वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे.

ठाणे जिल्ह्यात बालिकेचा मृत्यू

दुसरीकडे, घराबाहेर खेळण्यासाठी गेलेल्या चिमुकलीचा मृतदेह नजीकच्या पाण्याने भरलेल्या डबक्यात आढळल्याची धक्कादायक घटना शनिवारी दिवा येथील शिळफाटा भागात घडली. शिळफाटा येथील खान कंपाउंडमागे संबंधित सहा वर्षीय चिमुकली कुटुंबियांसह राहत होती. शुक्रवारी ती घराबाहेर खेळण्यासाठी गेली होती. मात्र सायंकाळी ती घरी न परतल्याने कुटुंबियांनी शोधमोहीम सुरू केली. सकाळी या मुलीचा मृतदेह पाण्याच्या डबक्यात आढळून आला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!