Home » ब्लॉग » शिवणे भागात शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार

शिवणे भागात शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार

Facebook
Twitter
WhatsApp
87 Views

शिवणे भागात शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार

शिवणे (प्रतिनिधी ) : सालाबाद प्रमाणे  ६ जून रोजी ३५२ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा श्रीमंत अष्टविनायक मित्र मंडळ व श्री अतुल दिगंबर दांगट (पाटील) यांच्या विद्यमाने पार पडला . दरवर्षी प्रमाणे यावेळी देखील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवणे, उत्तमनगर, कोपरे व कोंढवे -धावडे गावातील सुमारे ४०० नागरिकांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतला होता.

               या शिबिराचे व्यवस्थापन भारती ब्लड बँक व महा ब्लड बँक यांनी केले होते. यावेळी प्रत्येक रक्तदात्यास श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती अतुल दांगट यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी समस्थ ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस हार घालून राजदंड उभारून शिववंदना घेण्यात आली व महाराजांच्या नावे  घोषणा देण्यात आल्या.

          शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्याचे हे १३ वे वर्ष होते. तसेच शिवराज्याभिषेक दिनानिमीत्त रक्तदान शिबीर आयोजीत करण्याचे ६ वे वर्ष होते.

या सोहळ्या निमित्त आलेल्या सर्व नागरिकांचे व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले . कार्यक्रमाच्या स्वागतपर श्री अतुल दांगट यांनी भाषण केले तर आभार विकास दांगट यांनी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!