कॅनॉल रोड चे डांबरीकरण झाल्यास शिवणे , उत्तमनगरमधील ट्रॅफिक कमी होईल – सचिन वि. दांगट
शिवणे ( प्रतिनिधी ) : शिवणे भागाच्या प्रमुख समस्या बाबत पुणेमनपा मध्ये मा.श्री. आयुक्त साहेब, श्री.उपायुक्त साहेब, श्री. पथ अभियंता ,यांच्या समवेत काही दिवसापूर्वी आमदार भीमराव अण्णा तापकीर तसेच सचिन विष्णुपंत दांगट व इतर यांची महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये आपल्या भागातील प्रमुख कॅनॉल रोडचा प्रश्न मांडला होता
त्याप्रमाणे बुधवार दिनांक ११ / ६ / २०२५ रोजी शिवणे,देशमुखवाडी,उत्तमनगर, ते कोंढवे,कोपरे कॅनॉल रोडची पाहणी पुणे मनपा कडून करण्यात आली. यावेळी पुणे मनपा पथ विभागाचे उपअभियंता श्री हांडे साहेब, कनिष्ठ अभियंता सौ.सोळंकी मॅडम,कनिष्ठ अभियंता श्री बोंडे साहेब उपस्थित होते
शिवणे मेन ट्रॅफिक चा प्रश्न सोडवणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यानुसार अहिरे गेट पासून पुढे अय्यप्पा मंदिर कोपरे रोड या ठिकाणांच्या रोडचे डांबरीकरण काम पूर्ण होण्यात आहे.
येणाऱ्या काळामध्ये नवनाथभाऊ दांगट चौक (शिंदे पूल) सर्वे नंबर 97 देशमुखवाडी, पासून पुढे कोपरे, कोंढवे धावडे पर्यंत कॅनॉल रोड करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहेत असे सचिन वि दांगट म्हणाले .
यावेळी उपस्थित भाजप नेते उमेशभाऊ सरपाटील, अभिजीत दादा धावडे, भगवानराव मोरे, निखिल दांगट, गजानन वानखेडे, गणेशजी पोळ, माऊली रायरेकर, रोहित परदेशी, तसेच भाजप कार्यकर्ते उपस्थित होते .