Home » ताज्या बातम्या » पीएमपीएमएल बस प्रवासाची दरवाढ रद्द करा समाजवादी पार्टी पुणे शहर कडुन तिव्र आंदोलन करण्याचा इशारा

पीएमपीएमएल बस प्रवासाची दरवाढ रद्द करा समाजवादी पार्टी पुणे शहर कडुन तिव्र आंदोलन करण्याचा इशारा

Facebook
Twitter
WhatsApp
123 Views

पीएमपीएमएल बस प्रवासाची दरवाढ रद्द करा समाजवादी पार्टी पुणे शहर कडुन तिव्र आंदोलन करण्याचा इशारा

पुणे (प्रतिनिधी ) :
प्रशासनाकडुन जुन महिण्यापासुन पुण्यातील पीएमपीएमएल बसची तिकीट दरवाढ करण्यात आली आहे. या तिकीट दरवाढीमुळे नियमितपणे बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला आर्थिक झळ बसणार आहे. सर्वसामान्य प्रवाशांना ही दरवाढ परवडणारी नसल्याने ही दरवाढ रद्द करण्याची मागणी समाजवादी पार्टी च्या पदाधिकाऱ्यांकडुन करण्यात येत आहे.

याबाबतचे निवेदन समाजवादी पार्टी पुणे शहर च्या वतीने शहराचे नेते विनायक लांबे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार दि. 12 जुन 25 रोजी पीएमपीएमएल चे सहव्यवस्थापक नितीन नार्वेकर
यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे. या वेळी पुणे शहर सरचिटणीस दत्ता पाकिरे, प्रदेश कार्यकारणी सदस्य अशोक गायकवाड, प्रकाश डोंबाले, इब्राहीम भाई यवतमाळवाले आणि पदाधीकारी उपस्थित होते .

पीएमपीएमएल प्रशासनाकडुन नव्याने लागु केलेल्या या तिकीट दरवाढी मुळे बस प्रवाशांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. याचा नागरीकांना त्रास होत असुन वाढलेली ही बसची दर वाढ जर रद्द झाली नाही तर समाजवादी पार्टी पुणे शहरच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला असल्याचे दत्ता पाकीरे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!