नामदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वारजेतील संजीवन वन उद्यानात वृक्षारोपण
वारजे डुक्करखिंड येथील संजीवन वन उद्यानात वृक्षारोपण करताना आमदार भिमराव तापकीर व नागरिक
पुणे : प्रतिनिधी
नामदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त
भाजपा प्रभाग 32 चे अध्यक्ष वासुदेव शिवाजी भोसले यांच्या वतीने वारजेतील डुक्करखिंड येथील संजीवन वन उद्यानात आमदार भिमराव तापकीर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी चिंच, वड, पिंपळ, जांभूळ, आपटा आदी विविध प्रकारच्या झाडांचे यावेळी रोपण करण्यात आले. यावेळी आमदार भीमराव तापकीर, भाजपचे गणेश वरपे, चित्रपट आघाडीचे शहराध्यक्ष राजीव पाटील, सामाजीक कार्यकर्त्या रोहिणी भोसले, प्राजक्ता देव, मोनिका मोहरीर, वैदही देशपांडे, अभिजीत निंबाळकर, दादा दबडगाव, अनिल देशपांडे, बंडोपंत चिंतावर, सुहास गोखले, वनपाल विशाल यादव, वनरक्षक कृष्णा हाके, तसेच विविध सोसायटी मधील पदाधिकारी उपस्थित होते. सध्या पावसाचे दिवस सुरू असुन पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे, असे आवाहन यावेळी भोसले यांनी उपस्थितांना केले.