Home » महाराष्ट्र » महाराष्ट्रातील प्रमुख घडामोडी

महाराष्ट्रातील प्रमुख घडामोडी

Facebook
Twitter
WhatsApp
115 Views

          ताज्या बातम्या     ‘

महाराष्ट्रातील प्रमुख घडामोडी    

      सार्वभौम न्युज समूह

 १९ ऑगस्ट,२०२५, मंगळवार

 

🔘मुंबई-ठाण्यासह राज्यभरात पावसाचे धुमशान, मराठवाड्यात ढगफुटीसदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत, पुढचे 48 तास महत्त्वाचे,  मुंबई ठाण्याला पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट, पाणी साचल्यानं मुंबईसह, नवी मुंबईतील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी, तर ठाण्यातील शाळांना सुट्टी.

 

🔘मराठवाड्यात पावसाचं थैमान, आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू, अनेक गावांमध्ये नद्यांचं पाणी शिरलं, लातूर, नांदेडमधून शेकडो नागरिकांचं स्थलांतर, मुखेडमध्ये कमरेइतक्या पाण्यातून अंत्ययात्रा,  मराठवाड्यात घरादाराची पडझड, गुरं ढोरं वाहून गेली, अनेकांचा मृत्यू,

 

🔘कोकणाला मुसळधार पावसानं झोडपलं, जगबुडी आणि नारंगी नद्या धोक्याच्या पातळीवर, नदीकाठची गावं पाण्याच्या विळख्यात,  रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट, मच्छिमारांना समुद्रान न जाण्याचं आवाहन.

 

🔘मुंबईत संध्याकाळी समुद्राला भरती, नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, पावसाच्या थैमानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन, राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन समितीकडून आढावा,  मुंबईच्या चेंबूरमध्ये मुसळधार, इमारतींचा तळ मजला पाण्यात, चेंबूरमध्ये भिंत कोसळली, रस्ते, रेल्वे, हवाई वाहतुकीवर परिणाम.

 

🔘मुंबईतील बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेची 21 संचालकांना नोटीस, तर मतदारांच्या घरी पाचशेच्या नोटा असणारी पाकिटं पोहोचल्याचा मनसेचा आरोप.

 

🔘आपण स्वदेशीचा नारा देतोय, पण आधी शेतकऱ्यांवरील बंधनं हटवा, मंत्री छगन भुजबळांचा महायुती सरकारलाच उपरोधिक सल्ला, कृषिमंत्री म्हणून शरद पवारांनी केलेल्या कामाचं भुजबळांकडून कौतुक.

 

🔘वाल्मिक कराडच्या निर्दोषमुक्तीसाठी वकिलांचा पावणे दोन तास युक्तिवाद; तर उज्ज्वल निकमांचे सव्वा तासात सडेतोड उत्तर, पुरावेच मांडले, संतोष देशमुख प्रकरणात आजची सुनावणी पूर्ण, आता 30 ऑगस्टच्या सुनावणीची प्रतीक्षा.

 

🔘पोलिसांवर मारहाण अन् शिवीगाळ केल्याचा आरोप करणाऱ्या पुण्यातील तीन मुलींविरोधात सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल,   पोलीस कस्टडीमध्ये असताना पोलिसांनीच सोन्याचे दागिने घेतल्याचा आरोप, नागपूरमधील घटनेचे न्यायालयाकडून चौकशीचे आदेश.

 

🔘उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली, इंडिया आघाडीकडून तामिळनाडूतून उमेदवार देण्यासाठी हालचाली सुरू, महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी जाहीर,भाजपनं पुन्हा जुना पॅटर्न वापरला.

 

🔘भारतीय संघ आशिया कपमध्ये 14 सप्टेंबरचा पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळणार नाही, माजी क्रिकेटपटू आणि भाजप नेता केदार जाधवचा दावा, सूर्यकुमार यादवसह 11 खेळाडूंची संघात जागा पक्की, राखीव 4 जागेसाठी 7 खेळाडू रेसमध्ये, BCCI लवकरच करणार संघाची घोषणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!