बोरविहीर ग्रामस्थानी केला नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सत्कार
सार्वभौम न्युज समूह
धुळे (का. प्र ) धुळे जि.प. चे नुकताच पदभार स्वीकारलेले मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख साहेब आय. ऐ .एस. यांचा बोरविहीर येथील माझी आयुक्त जीवन सोनवणे यांच्या वतीने बोरविहीर येथील माझी जि.प. सदस्य किरण ठाकरे माझी शिक्षण विस्तार अधिकारी शरद पाटील मुख्यध्यापक प्रकाश सोनवणे. पोलीस पाटील वाल्मीक सोनवणे अनिल गवळी मनोज सोनवणे, ग्रा.प.सदस्य अमोल ढमढेरे, लक्षुमन वाघ, व ग्रामविकास अधिकारी उमाकांत बोरसे इत्यादिनी शाल श्रीफळ बुके देऊन हद्यस्थ स्वागत सत्कार केला.
महाराष्ट्र जीवन गैरव पुरस्कार प्राप्त बोरविहीर चे सुपुत्र माझी आयुक्त जीवन सोनवणे यांचे धुळे जिल्हा परीषदेत नुकतेच बदली हुन पदभार स्वीकारलेले आय. ए.एस. मुख्य कार्यकारी अधिकारी आजिज शेख साहेब जवळचे मित्र असल्याने जुन्या आठवणीना उजाळा देत. भावना विविश झाले मुख्यध्यापक प्रकाश सोनवणे यांनी परीचय करून घेतला किरण ढाकरे यांनी जलजीवन मिशनच्या पाणी पुरवठ्याची माहिती दिली शरद पाटील यांनी ग्राम विकासासाठी विविध योजनाच्या माध्यमातून बोरविहीर गावाचा विकास आपल्या कार्यकाळात व्हावा अशि अपेक्षा व्यक्त केली.
पोलीस पाटील व यशदाचे मास्टर ट्रेनर वाल्मीक सोनवणे यांनी ही परीचय करून घेत. वरील म्हणण्या ला दुजोरा दिला. ग्राम विकास अधिकारी उमाकांत बोरसे यांनी ग्रा.प. च्या चालू असलेल्या विकास कामाची माहिती देत ग्राम विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्नशिल असल्याचे म्हणाले. अनिल गवळी लक्षुमन वाघ मनोज सोनवणे अमोल ढमढेरे यांनी ग्राम विकासासाठी नेहमी तत्पर असल्याचे अश्वासन मुख्यकार्यकारी अधिकारी यांना देत बोरविहीर गावी येण्याचे आमत्रण दिले . मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबानी माझी आयुक्त जीवन सोनवणे साहेबाबरोबर येण्याचे अश्वासन दिले.