पुणे महापालिकेची प्रभाग रचना आज सायंकाळी ७.०० वाजता जाहीर होणार
इच्छुकांची उत्सुकता शिगेला !
सार्वभौम न्युज समूह
पुणे : प्रतिनिधी महापालिकेच्या आगामी निवडणुकीची प्रारुप प्रभाग रचना आज (शुक्रवारी) २२ ऑगस्टला सायंकाळी ७.०० वाजता पुणे महानगर पालिका येथे निवडणूक प्रभाग रचनेचे प्रकाशन पुणे महानगरपालिका आयुक्त मा.श्री.नवल किशोर राम
यांच्या हस्ते मनपा आयुक्त कार्यालय चौथा मजला येथे होणार आहे. . राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे.
प्रभाग रचनेमध्ये राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने मोठे बदल केल्याची चर्चा असून प्रभाग रचना नक्की कशी झाली आहे? याबाबत इच्छुकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. तर काही इच्छुकांनी मनासारखी प्रभाग रचना व्हावी यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत.