रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) मातंग आघाडीच्या पुणे शहर अध्यक्षपदी महादेव भडकवाड यांची नियुक्ती
पुणे (प्रतिनिधी ) : शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीत गेले 35 वर्ष कार्यरत असणारे व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार माननीय नामदार रामदासजी आठवले यांच्याशी एकनिष्ठ असलेले व स्वर्गवासी नेते हनुमंतराव साठे यांच्या पासून ते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय आनंद अण्णा वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. प्रदीप भाऊ कांबळे यांचे विश्वासू ज्यांनी पॅंथर काळापासून चळवळीमध्ये स्वतःला झोकून आत्तापर्यंत सातत्याने मातंग आघाडीमध्ये पश्चिम महाराष्ट्र सहसचिव म्हणून काम करणारे मा. महादेव भडकवाड यांची आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले मातंग आघाडीच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांना पुढील सामाजिक,राजकीय, शैक्षणिक, व क्रीडा क्षेत्रामध्ये पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा.
यावेळी उपस्थित महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संतोष भाऊ काची, महाराष्ट्र प्रदेश सचिव खंडू दादा शिंदे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप भाऊ कांबळे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष आरती ताई डावरे, पश्चिम महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी बाळासाहेब कनगरे, मातंग आघाडीचे नेते अण्णासाहेब सकट, पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष पूनम ताई जाधव, पुणे शहर महिला अध्यक्ष नेहा ताई पवार पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अश्विन भाऊ खुडे संतोष भाऊ कांबळे, मंथन अवघडे, सचिन देडे, आकाश बेंडकाळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.