सपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विनायक लांबे निवडणूकीसाठी रिंगणात उतरणार
समाजवादी पार्टी कडुन पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सुचना
सार्वभोम न्युज समूह
पुणे : प्रतिनिधी
पुणे महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या असुन महापालिकेकडुन प्रारूप प्रभाग रचना देखील जाहीर करण्यात आली आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच समाजवादी पार्टीच्या पुणे शहर पदाधिकारींकडुन समाजवादी पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांची दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेण्यात आली.
यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याबाबतीत देखील चर्चा करीत निवडणुकीत उमेदवारांना पक्षाकडुन योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. समाजवादी पार्टीकडुन प्रदेश कार्यकारणी सदस्य विनायक श्रीकृष्ण लांबे हे महानगरपालिका निवडणुकीत इच्छुक असुन त्यांना पुणे महानगरपालिकेच्या वारजे – पाॅप्युलर नगर प्रभाग क्रमांक 32 मध्ये निवडणुक लढविण्यासाठी पक्षाकडुन हिरवा कंदिल मिळाला असल्याचे लांबे यांनी सांगितले असुन त्या दृष्टीने त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे.
विनायक लांबे यांनी वारजे – पाॅप्युलर नगर प्रभागातील शिवणे, वारजे माळवाडी तसेच भागातील नागरिकांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. विविध सामाजिक संघटना आणि आंबेडकरी चळवळीतील संघटना आणि पदाधिकाऱ्यांनी लांबे यांना पाठिंबा जाहीर केला असुन 2025 पुणे महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महापालिकेत पुण्यातुन यंदा समाजवादी पार्टीचे नगरसेवक निवडून जातील अशी विश्वास लांबे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.