गणेश उत्सव व मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त वारजे माळवाडीमध्ये दिसले हिंदू – मुस्लिम एकतेचे दर्शन
सार्वभौम न्युज समूह
वारजे (प्रतिनिधी) : अखिल सुरभी कॉलनी मित्र मंडळ सध्या 25 व्या वर्षात पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे हे मंडळ व मस्जित आगदी बाजूबाजूला असून गेल्या 25 वर्षांपासून सर्वधर्म समभाव या पद्धतीने सर्वजण एकत्र येऊन सण साजरा करत असतात.
या वेळी गणेश उत्सव व मोहम्मद पैगंबर जयंती एकत्र आल्याने सर्वांमध्ये वेगळाच उत्साह दिसून आला आहे.
त्या निमित्त आज गणरायाची आरती वारजे मधील मुस्लिम समाजाचे हमीद शेख, आलम पठाण, आमिर शेख, अमजद खान, दस्तगीर शेख मुशेब शेख इत्यादी यांनी केली.
या मंडळाचे आधारस्तंभ आकाश पाटील संस्थापक सोनू यादव, किरण यादव ,अध्यक्ष प्रसाद देशमुख, उपाध्यक्ष प्रथमेश पाडीले,आयोजक शाहिद मणियार हे आहेत.