Home » ब्लॉग » निराधार, अपंग ,गरजू वृद्धांना आधार देणारी निराधार ज्येष्ठांची लेक छायाताई भगत

निराधार, अपंग ,गरजू वृद्धांना आधार देणारी निराधार ज्येष्ठांची लेक छायाताई भगत

Facebook
Twitter
WhatsApp
106 Views

निराधार, अपंग ,गरजू वृद्धांना आधार देणारी निराधार ज्येष्ठांची लेक छायाताई भगत

सार्वभौम न्युज समूह

 

वृत्तसंस्था : तेजस्वी फाउंडेशन संचलित सुर्योदय वृद्धाश्रम आज आपल्याला दिसणारे वृद्ध हे केवळ भार नाहीत, तर तेच कालचे कर्तबगार तरुण तरुणी होते. ते काल होते म्हणून आपण आज आहोत. त्यांनी आपल्या आयुष्यात श्रम, त्याग, कर्तृत्व याच्या बळावर कुटुंबं उभी केली, समाज घडवला, राष्ट्राला हातभार लावला. आज जेव्हा ते अशक्त, निराधार होतात तेव्हा त्यांना आधार देणं ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे.

तेजस्वी फाउंडेशन ही सामाजिक संस्था
संस्थेच्या अध्यक्षा छायाताई भगत या
संस्थेच्या माध्यमातून गेली 13 वर्षे अनेक सामाजिक विषयांवर काम करतात पण निराधार, अपंग वृद्धांचे हाल पाहून एकटे निराधार, गरजू वृद्धांसाठी एक हक्काचे घर मिळावे म्हणून धायरी येथे सुर्योदय वृद्धाश्रम सुरू केला.. व
अनेक संघर्षांना तोंड देऊन गेल्या 5 वर्षांपासून छायाताई भगत, त्यांच्या सामर्थ्यानुसार स्वकष्टाने आणि समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने निराधार, अपंग आणि गरजू वृद्धांची काळजी घेत आहेत… काही वृद्ध पूर्णपणे बेघर, निराधार व आर्थिक दृष्टीने असक्षम असणारे आहेत.. मुलं नाहीत किंवा वारली आहेत असे वृद्ध अनेक आजारांनी त्रस्त आहेत… .
काही वृद्धांना मुलं आहेत ते त्यांच्या ऐपतीनुसार मदत करतात.. अशा सर्व प्रकारच्या वृद्धांसाठी सुरु केलेला आश्रम म्हणजेच तेजस्वी फाउंडेशन संचलित सुर्योदय वृद्धाश्रम होय.

सेवेसाठी संघर्ष

 

या सेवेला सुरू करतांना आणि टिकवताना अनेक संघर्ष करावे लागतात. आश्रमाची जागा भाड्याने असल्यामुळे वेळोवेळी बदलावी लागते. वृद्धांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवणे हे त्यांच्यासाठीही आणि आमच्यासाठीही फार कठीण ठरतं. अनेकदा वृद्धत्वामुळे अचानक तब्येत बिघडते अशा वेळी धावपळ, दवाखान्यात दाखल करावे लागते अशा अनेक संघर्षांना सामोरे जावे लागते तरीही वृद्धांच्या डोळ्यातली भीती नाहीशी करून, सुरक्षिततेची भावना देणं माझं पहिलं कर्तव्य आहे असे छायाताई भगत म्हणतात..

आश्रमातील दैनंदिन गरजा पूर्ण करताना मोठी धावपळ करावी लागते. जागेचे भाडे, लाईटबील, अन्न, औषधं, डॉक्टर, दुध, भाजी, कपडे, स्वच्छता, मानसिक आधार, मदतीसाठी मदतनीस, सणवार असे एक ना अनेक खर्च आहेत. काही वृद्ध निराधार, अपंग आहेत, काही जणांनी त्यांचे पुर्ण पालकत्व उचलले आहे तर काहींची मुलं, मुली त्यांच्या ऐपतीनुसार हातभार लावतात. तरीही उरलेला खर्च छायाताई त्यांच्या वैयक्तिक कमाईवर करतात आणि काही खर्च समाजातील मदतीवर अवलंबून असतो. त्यामुळे खूप जुळवाजुळव करताना धावपळ करावी लागते कधीतरी ही जुळवाजुळव होत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली तर काळजीने जीव कासावीस होतो. पण या वृद्धांकडे पाहीले की नव्याने बळ येते असे त्या सांगतात….
रोज अनेक ठिकाणांहून आम्हाला कोणी नाही आम्हाला आश्रमात घ्याल का असे फोन येतात पण आज रोजी यापेक्षा जास्त जबाबदारी उचलणे शक्य नाही म्हणून नाईलाजाने नाही घेऊ शकत असे सांगावे लागते. त्याचे त्यांना फार वाईट वाटते पण नाईलाज आहे असे ताई सांगतात…..

अनुभवांचे हृदयस्पर्शी क्षण

सुरुवातीला आश्रमात येणारे अनेक निराधार वृद्ध घाबरलेले असतात. अनेक आजारांनी ग्रस्त असतात मनाने, शरीराने थकलेले “आमचं कोणीही नाही, आता काय होणार?”, “आम्हाला खरंच इथे आसरा मिळेल का?” असे प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर दिसतात. पण थोड्याच दिवसांत त्यांना इथे घरगुती वातावरण, आपुलकी, प्रेम मिळते. हळूवार त्यांना समजून घेतले जाते आणि सुरक्षितता मिळते, मग ते स्थिरावतात..

आज सुर्योदय वृद्धाश्रम हे 25 वृद्धांचे एक मोठे कुटुंब तयार झाले आहे. कुणी आजारी पडले तर इतर त्यांची विचारपूस करतात, एकमेकांना समजून घेतात कुणी गाणं म्हणत असेल तर सगळे टाळ्या वाजवतात, कुणी कथा सांगितली तर सगळे आनंदाने ऐकतात. ईथे सर्व सणवार आनंदाने साजरे होतात सर्व आजी, आजोबा आनंदाने सहभागी होतात. हा आपुलकीचा बंध म्हणजेच खरा ठेवा आहे असे छायाताई भगत म्हणतात.

छायाताई अनेकदा मनापासून म्हणतात –
“सुर्योदय वृद्धाश्रम हे नाव जरी असले तरी सुर्योदय हे ज्येष्ठांचे हक्काचे घर आहे.”

समाजाला आवाहन…

आज निराधार, अपंग, गरजू वृद्धांसाठी या सेवेला अधिक बळ देण्याची गरज आहे. प्रत्येक दिवस नवनवीन आव्हान घेऊन येतो. जागेच्या, पैशांच्या आणि संसाधनांच्या कमतरतेमुळे अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. पण समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने हे कार्य पुढे नेत राहणं शक्य आहे.

माझी सर्वांना विनंती आहे –
या वृद्ध सेवाकार्यात सहभागी व्हा.
निराधार, अपंग आणि गरजू वृद्धांना सुख, आधार आणि सन्मानाने जगण्याची संधी द्या.

ते आज वृद्ध आहेत… कालचे कर्तबगार तरुण, तरुणी होते…
ते काल होते म्हणूनच आपण आज आहोत… आपण आजच्या जेष्ठांचा आधार बनूया…

छायाताई भगत म्हणतात “वृद्ध सेवा कार्य जरी मी सुरु केले तरी पुढे नेण्यासाठी आणि अखंड सुरू ठेवण्यासाठी अनेकांचे योगदान आहे. माझे सहकारी, मदत करणारे अनेक देणगीदार , वेगवेगळ्या संस्था,‌ दैनंदिन कामांसाठी मदत करणारे माझे सहकारी तेजस्वी फाउंडेशनचे सर्व सदस्य, तसेच साथ देणारे वृद्ध सर्वांच्या सहकार्यामुळे आज 25 वृद्धांना सांभाळत आहोत…

आपण आपली मदत
यावर किंवा
AC : TEJASWI FOUNDATION
BANK : Janseva sahkari Bank
Branch : Manikbag, pune – 411041
AC no : 13023018803
IFSC : JANA0000013

GP PHONE PAY
9881899732

सुर्योदय वृद्धाश्रम, शिक्षा वेरीटास हायस्कूल शेजारी महादेवनगर, धायरी, पुणे 41
आपण नक्कीच या ज्येष्ठांच्या आनंदी घराला भेट द्या

—संचालिका : छायाताई भगत
संपर्क : 9604516653 / 9921912727

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!