पुणे येथील एका अधिकाऱ्याचा महापराक्रम स्वतःच स्वतःच्या आदेशाने स्वतःची नेमणूक
मुंबई : पुणे येथील पणन संचनालय मधील एका अधिकाऱ्याचा महापराक्रम पुढे आला असून या महोदयाने स्वतःच स्वतःच्या आदेशाने स्वतःची नेमणूक मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकपदी करून घेतली आहे. अशाप्रकारे स्वतःच्या अधिकारात स्वतःचीच प्रशासकपदी नियुक्ती करता येते का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
आदेश प्रत
या अधिकाऱ्याचे नाव विकास रसाळ आहे ते पणन संचालक महाराष्ट्र पुणे येथे कार्यरत असताना त्यांनी पुढील आदेश काढला आहे .
मी, विकास रसाळ, पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे मला महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ चे कलम १५ (अ) अन्वये प्राप्त अधिकारानुसार आदेश देतो की, मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती, मुंबई या बाजार समितीचे सर्व समिती सदस्य दि. ३१/०८/२०२५ पासून सदस्य म्हणून त्यांचे पद धारण बंद होऊन ती सर्व पदे रिकामे झालेली असल्याने मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती, मुंबई या बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक होऊन प्रत्यक्षात संचालक मंडळ कार्यरत होईपर्यंत किंवा या आदेशाच्या दिनांकापासून पुढील सहा महिने यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती, मुंबई या बाजार समितीचे दैनंदिन व प्रशासकीय कामकाज पार पाडण्यासाठी श्री. विकास रसाळ, पणन संचालक महाराष्ट्र राज्य, पुणे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करीत आहे. आहे. सदरचा आदेश आज दि.२९.०८.२०२५ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी निर्गमित केला
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजार समिती होत असून यासाठी हजारो कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. या निधीवर डल्ला मारण्यासाठी तर ही नियुक्ती होत नाही ना? असा संशय निर्माण होत आहे. यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांची भेट घेऊन याप्रकरणात योग्य ती कारवाई करण्याची विनंती रोहीत पवार यांनी केली आहे.
Devendra Fadnavis
Ajit Pawar
Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे
Jaykumar Rawal