मुलं किंवा आपण मोठे सुद्धा कधी कधी घरचे अन्न खाताना म्हणतो “अगदी हॉटेल सारखी चव झालीये, अगदी त्या अमुक ठेल्यावरल्या सारखी पाणीपुरी/ भेळ झालीये” … तर असं ज्यांना वाटतं की “घरची चव ही हॉटेल सारखी किंवा ठेल्यावरची असावी” … त्यांनी नक्की वाचावे
पुढील पोस्ट एका व्हाट्सअप ग्रुप वर “फॉरवर्डेड मेनी टाईम्स” या स्वरूपात मिळालेली आहे
ती कॉपी-पेस्ट केली आहे
टी. चंद्रशेखर ठाणे महापालिका आयुक्त असताना त्यांनी तलावपाळी, स्टेशनवरच्या फेरीवाल्यांना हटवणे, अनधिकृत बांधकामे पाडणे वगैरे करत ठाणे सुंदर बनवायचा प्रयत्न सुरू केला होता. त्या काळात मी ‘आज दिनांक’ची ठाणे प्रतिनिधी म्हणून फोटोग्राफीचं काम बघत होते. त्या अनुषंगाने रोजच त्यांची भेट व्हायची. एकदा त्यांच्या दालनात बसुन गप्पा मारत असताना मी तळ्यावरच्या पाणीपुरीवाल्यांना हाकलल्या बद्दल नाराजी व्यक्त केली. सोपान बोंगाणे, श्रीकांत नेर्लेकर वगैरे जेष्ठ पत्रकार पण होते.
चंद्रशेखर यांनी हसत हसत सांगितल की उद्या संध्याकाळी माझ्या घरी ये आणी तुझी फेवरेट पाणीपुरी कुठे मिळते, तिकडे माझ्या पत्नीला पण घेऊन जा. पण माझ्यासाठी एक स्टोरी कर. सकाळी ठाणे सिव्हिल हॉस्पिटल मधे जा आणि त्यांच्या OPD मधल्या त्वचा रोगाच्या पेशंट ना भेट, त्यांच्या समस्या जाणून फोटो काढ, लिहा त्यावर मग संध्याकाळी पाणीपुरी ची पार्टी माझ्या कडुन.
दुसऱ्या दिवशी मी आणि आमचा वार्ताहर अरुण मुरकर तिथे गेलो. मुख्य चिकित्सा अधिकार्यांना भेटलो आणि त्यांच्याच बरोबर ओपीडी मधे आलो. त्या तीन तासात मी जे काही बघीतलं ते आयुष्य भर विसरणार नाही. ९९% हाताचे त्वचा रोगी हे पाणीपुरी वाले होते. जे केमिकल पाण्याची चव वाढवण्यासाठी टाकतात त्यामुळे त्यांची त्वचा जळते आणी गळायला लागते. हातात किडे पडतात. पण पापी पेट का सवाल म्हणत ते काम करत रहातात. त्यांच्या हातानी ते इंफेक्शन पाण्यात जातं. त्या वेळी त्या रोग्यां कडून मी जे काही ऐकलं, त्यांच्या हातांची जी अवस्था बघीतली, त्या नंतर माझी रस्त्यावर पाणीपुरी खाण्याची हिम्मत झाली नाही. तीच परिस्थिती रस्त्यावरच्या लिंबू सरबत, गोळा वगैरे वाल्यांची होती, पाणी कुठलंही वापरायचं कारण स्विटनरनी चव बदलते. गोडवा आणायला हॉस्पिटल मधुन एक्सपायर झालेले सलाईन वापरायचे. ते स्वस्त म्हणून.
आता कायदे कडक झाल्यावर हे कमी झालं असेल पण बंद होणं शक्य नाही. माझी मोठी नणंद सरकारी डॉक्टर आहे. तिने सांगितलं होतं की पुर्वी युपी मधल्या सरकारी हॉस्पिटल मधे mortuary मधे AC तेवढे चांगले नसायचे. तेव्हा प्रेते ठेवायला बर्फाच्या लाद्या वापरल्या जायच्या. दररोज रात्री काही लोक त्या वापरलेल्या लाद्या घेऊन जायला ठेले / हातगाड्या घेऊन यायचे, आणी नंतर नेऊन विकायचे. तो बर्फ हे गोळा वाले, लिंबू सरबत वाले विकत घेऊन जायचे.
म्हणूनच रस्त्यावरचे खाद्य पदार्थ खाताना दहावेळा विचार करा आपण काय खातोय ह्याचा.
श्रीमती सुखदा प्रधान सिंग
Ex Photojournalist
आपण रोज जरी रस्त्यावरचे खात नसलो तरी कधीच का खाऊ नये म्हणून ही पोस्ट.