Home » धर्म » पुणे शहरातील मिरवणूक सुरूच . . .

पुणे शहरातील मिरवणूक सुरूच . . .

Facebook
Twitter
WhatsApp
205 Views

 पुणे शहरातील मिरवणूक सुरूच . . .

सार्वभौम न्युज समूह

 

पुणे (प्रतिनिधी ) : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीचं राज्यभरात आकर्षण असतं. यंदाही या मिरवणुका रेकॉर्ड करणार असल्याचं दिसून येत आहे. पुण्यातील विसर्जन मिरवणुका अजूनही सुरू आहेत.

रात्री 12 नंतर डीजे बंद केल्याने अनेक वेळ मिरवणूक रेंगाळली होती. मात्र पहाटे 6 वाजल्यापासून पुन्हा डीजे सुरू झाला. आता (Pune Ganpati Visarjan Miravnuk) पुन्हा सकाळपासून डीजेचा दणदणाट सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे. अजूनही शेकडो गणेश मंडळे कुमठेकर,लक्ष्मी आणि केळकर रस्त्यावर थांबून आहेत. मुख्य विसर्जन मिरवणूक सुरू होऊन 20 तास उलटले तरीही शहरात मिरवणूक सुरूच आहे.

पुण्यातील मानाच्या पाचही गणपतीचं विसर्जन पार पडलं असून पुण्यातील अनेक लहान-मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांचं विसर्जन अद्याप बाकी आहे. हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती पहाटे 3 वाजता अलका टॉकीज चौकात दाखल झाला. भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या विसर्जन मिरवणुक पारंपरिक रथातून काढण्यात आली. अलका टॉकीज चौकातून भंडाऱ्याची उधळण आणि आतिषबाजी करत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला निरोप देण्यात आला तर 3 वाजून 51 मिनिटांनी रंगारी गणपतीच विसर्जन पार पडलं.

मिरवणुकीत दोन गटात बाचाबाची

यंदाही या मिरवणुकीत शेकडो गणेश भक्त सामील झाले होते. मात्र विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. तरुणांची एकमेकांना मारहाण केल्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाद झाल्याने तरुणांमध्ये हाणामारी झाली. पोलिसांच्या मध्यस्थीने वाद थांबला. अल्का टॉकीज चौकात मिरवणुकीदरम्यान बाचाबाची झाली होती.

 

सौजन्य – NDTV मराठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!