इंडिया आघाडीची मतं फुटली; कोणी केली क्रॉस व्होटींग, कुठे गेम फिरला?
सार्वभौम न्युज समूह
उपराष्ट्रपती निवडणुकीत सीपी राधाकृष्णन विजयी.
इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी पराभूत.
४५२ मते राधाकृष्णन, ३०० मते रेड्डी यांना मिळाली.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सीपी राधाकृष्णन यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची ४५२मते मिळाली. तर इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना पहिल्या पसंतीची ३०० मते मिळाली. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत ७६७ खासदारांनी मतदान केले . पण उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळालीत. तर राधाकृष्णन यांना जास्तीची १५ मते मिळाली नेमकं मतदानावेळी कुठे गेम झाला हे जाणून घेऊ. कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटींग केली याची चर्चा आता सुरू झालीय.
इंडिया आघाडीतून क्रॉस वोटिंग
इंडिया आघाडीतून क्रॉस वोटिंग झाले असल्याचे समोर आले आहे. एनडीएकडे एकूण ४२७ खासदार होते. मात्र जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसच्या ११ खासदारांनी राधाकृष्णन यांना मतदान केलं.त्यामुळे हा आकडा ४३८ पर्यंत पोहोचला. मात्र सीपी राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची एकूण ४५२ मते मिळाली,याचा अर्थ १४ विरोधी खासदारांनी एनडीए उमेदवाराला मते दिली. याच कारणामुळे बी सुदर्शन रेड्डी यांना पहिल्या पसंतीची ३१४ मते मिळायला हवी होती, मात्र त्यांना ३०० मतांवर समाधान मानावे लागलंय.
उपराष्ट्रपती निवडणुकीचा निकाल लागताच राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. शिवसेनेचे नेत संजय निरुपम यांनी सीपी राधाकृष्णन यांचे अभिनंदन केलंय. त्यानंतर इंडिया आघाडीला टोला देखील लगावला. एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळाली. तर विरोधी पक्षाच्या उमेदवाराला ३०० मते मिळाली. जवळपास १५२ मतांचे अंतर आहे. त्यामुळे विरोध पुन्हा मत चोरीचे आरोप करणार नाही.
दुसरीकडे, खासदार नरेश म्हस्के यांनी इंडिया आघाडीवर टीका करताना कोणाची अतिरिक्त मते मिळाली याचा खुलासा केलाय. एनडीएच्या उमेदवाराला काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गटाच्या खासदारांनी मतदान केल्याचा खुलासा त्यांनी केलाय.