कलाप्रेमी वारजे, कोथरुडकरांना दोन दिवसांची मेजवानी ; कोथरूड येथे चित्र प्रदर्शन
सार्वभौम न्युज समूह
पुणे ( प्रतिनिधी ) : प्रसिद्ध चित्रकार चारुलता विनायक लांबे यांनी काढलेल्या विविध आकर्षक निसर्गचित्रांचे प्रदर्शन कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात नागरीकाना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.
पुण्यातील प्रसिद्ध चित्रकार चारुलता विनायक लांबे यांनी साकारलेली ही चित्रे असुन निसर्गाच्या विविध रूपांचे नयनरम्य निसर्गचित्र, आणि त्या चित्रांचे भारतातील विविध कलाप्रकार तसेच भावपूर्ण श्री गणरायाच्या विविध चित्रांच्या संग्रहाचे प्रदर्शन या ठिकाणी असणार आहेत. हे प्रदर्शन शनिवार दि.१३ व १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते सायं. ६ वाजेपर्यंत कोथरुड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील कलादालनात होणार असुन कला प्रेमींसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. हे विविध प्रकारच्या आकर्षक चित्रांचे प्रदर्शन नागरीकांसाठी मोफत ठेवण्यात आले असल्याची माहिती लांबे यांनी यावेळी दिली.