Home » राजकारण » मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी नाट्य सुरू

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी नाट्य सुरू

Facebook
Twitter
WhatsApp
50 Views

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी नाट्य सुरू

सार्वभौम न्युज समुह

 

मुंबई (प्रतिनीधी ) : एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांवर नाराज आहेत . तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटात देखील नाराजी नाट्य सुरु आहे. मुंबई महापालिकेच्या तोंडावर शिंदेच्या शिवसेनेकडून विभागप्रमुखांची नेमणूक केल्यामुळे  पक्षातील अनेक इच्छुकांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे. पश्चिम उपनगरात विभागप्रमुखांच्या नियुक्तीवरून नाराजी असतानाच दक्षिण मुंबईतही आता जाहिरपणे विभागप्रमुखांच्या नियुक्तीला विरोध होऊ लागला आहे. दक्षिण मुंबईतील शिवडी विधानसभेच्या विभागप्रमुखपदी माजी नगरसेवक नाना अंबोलेच्या नियुक्तीवरून पदाधिकार्यांमध्ये नाराजी आहे. शिवडी विधानसभा क्षेत्रातील ५ पैकी ४ शाखाप्रमुख आणि इतर पदाधिकारी या नियुक्तीमुळे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे . पक्षात प्रवेश करताना दिलेल्या वचनांची पूर्तता होत नसल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. तर आपल्यानंतर आलेल्यांना संधी दिल्याने काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच नाना अंबोलाच्या नियुक्तीच्या विरोधा पदाधिकाऱ्यांकडून उघड उघड सह्यांची मोहिम राबवत लवकरच याबाबतचं पत्र मुख्य नेते एकनाथ शिंदेंना दिले जाणार आहे. मुंबई महानगर पालिका निवडणुक शिंदेंसाठी महत्वाची माणली जात असताना, ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही नाराजी एकनाथ शिंदेंना परवडणारी नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!