42 Views
सौ. चारुलता लांबे यांच्या प्राचिन चित्रकला प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
सावेभौम न्युज समूह
कोथरूड (प्रतिनिधी) : दिनांक १३ व १४ सप्टेंबर रोजी यशवंतराव चव्हाण कलादालनात आयोजित “माझे चित्रविश्व” या सौ. चारुलता विनायक लांबे यांच्या एकल चित्र प्रदर्शनाला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रदर्शनाचे उदघाटन डॉ. माधवी मेहेंदळे यांच्या हस्ते झाले त्यांनी या प्रसंगी या प्राचिन चित्रकला जोपासल्या पाहिजेत तसेच त्याचे संवर्धन झाले पाहिजे . त्याची ही मुहूर्त मेढ म्हणता येईल असे मत व्यक्त केले. डॉ. माधवी मेहेंदळे या नेत्रतज्ञ आहेत . त्या देखील फाईन आर्ट च्या चांगल्या जानकार व चित्रकार आहेत .
भारतातील विविध कलाप्रकारां पैकी या चित्रप्रदर्शनात तेरा कला होत्या जसेकी वारली , मधुबनी ( मिथीला ), मंडला , गोंद आर्ट , बोहो , डॉट पेंटींग , अफ्रिकन आर्ट , ॲबस्ट्रॅक आर्ट ( अमुर्त कला चित्र ) , ॲक्रॅलीक पेंटींग , त्याच सोबत त्यांनी छंद म्हणून काढलेली गणेश चित्रे होती .
