Home » देश आणि परदेशात » काही तरी मोठं घडणार, सर्वोच्च नेता थेट न्यूक्लिअर बंकरमध्ये लपला; जग हादरवणाऱ्या घडामोडींचे संकेत ‘

काही तरी मोठं घडणार, सर्वोच्च नेता थेट न्यूक्लिअर बंकरमध्ये लपला; जग हादरवणाऱ्या घडामोडींचे संकेत ‘

Facebook
Twitter
WhatsApp
14 Views

काही तरी मोठं घडणार, सर्वोच्च नेता थेट न्यूक्लिअर बंकरमध्ये लपला; जग हादरवणाऱ्या घडामोडींचे संकेत ‘

तेहरान: इराणमध्ये आंदोलनांची तीव्रता सध्या काहीशी कमी झाली असली, तरी आंदोलनकर्त्यांच्या मृत्यूंची मालिका थांबलेली नाही. विविध अहवालांनुसार आतापर्यंत मृतांचा आकडा 5 हजारांच्या पुढे गेल्याचा दावा केला जात आहे.

 

या पार्श्वभूमीवर इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा एकदा कमालीचा वाढला असून, इराण चे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील शब्दयुद्धाने आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे.

 

खामेनेई यांनी ट्रम्प यांना थेट ‘गुन्हेगार’ (Criminal) ठरवले होते. यावर प्रत्युत्तर देताना ट्रम्प यांनी इराणमध्ये सत्तांतर (तख्तापलट) घडवून आणण्याची धमकी दिली होती. या घडामोडींनंतर आता एक अत्यंत महत्त्वाची आणि धोक्याची माहिती समोर आली आहे. अयातुल्ला खामेनेई अचानक बंकरमध्ये जाऊन लपले आहेत. यापूर्वी जेव्हा खामेनेई बंकरमध्ये गेले होते, तेव्हा इराणवर जोरदार क्षेपणास्त्र हल्ले झाले होते. त्यामुळेच आता पुन्हा एकदा इराणमध्ये काहीतरी मोठं घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

पुन्हा अंडरग्राउंड झाले खामेनेई

 

अमेरिकेशी वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अयातुल्ला अली खामेनेई पुन्हा एकदा ‘अंडरग्राउंड’ झाले आहेत. अमेरिकेकडून मिळालेल्या धमक्यांनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे गेल्या सात महिन्यांत खामेनेई दुसऱ्यांदा बंकरमध्ये लपले आहेत.

 

यापूर्वी जून महिन्यात खामेनेई तब्बल २१ दिवस भूमिगत बंकरमध्ये होते. त्या काळात अमेरिकेने इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ले केल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे सध्याची परिस्थितीही तशीच धोक्याची असल्याचे संकेत मिळत आहेत.

 

नेतन्याहू आणि ट्रम्प यांची थेट धमकी

 

खामेनेई बंकरमध्ये जाण्याआधी काही तासांपूर्वीच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणला धमकी दिली होती. “इराणवर असा हल्ला केला जाईल, जो यापूर्वी कधीही पाहिला नसेल,” असे नेतन्याहू यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते. इराणकडून इस्रायलविरोधात आखल्या जात असलेल्या कथित योजनांच्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला होता.

 

याच वेळी ट्रम्प यांची सत्तांतराची धमकी आणि नेतन्याहू यांचा थेट हल्ल्याचा इशारा या दोन्ही गोष्टींमुळे खामेनेई यांना मोठा धोका जाणवत असल्याचे म्हटले जात आहे. इस्रायलची गुप्तचर संस्था ‘मोसाद’ आणि अमेरिका एकत्र येऊन कधीही तेहरानवर हल्ला करू शकतात, अशी भीती इराणी नेतृत्वाला वाटत आहे.

 

खामेनेईंचा बंकर किती शक्तिशाली आहे?

 

खामेनेई ज्या बंकरमध्ये लपले आहेत, तो अत्यंत सुरक्षित आणि अभेद्य मानला जातो. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, हा बंकर लोखंड आणि फोर्टिफाइड काँक्रीटच्या अनेक थरांनी संरक्षित आहे. हा बंकर जमिनीखाली शेकडो फूट खोल असून, त्यावर परमाणु हल्ल्याचाही परिणाम होणार नाही, असा दावा केला जातो. इतकेच नव्हे, तर अमेरिकेचे सर्वात घातक ‘बंकर बस्टर’ बॉम्बही या बंकरला भेदू शकणार नाहीत, असे लष्करी विश्लेषक सांगतात.

 

या सगळ्या घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती पुन्हा एकदा अत्यंत स्फोटक वळणावर आली आहे. खामेनेईंचे भूमिगत होणे, अमेरिका-इस्रायलच्या धमक्या आणि इराणमधील अंतर्गत अस्थिरता या साऱ्यांमुळे आगामी काळात इराणमध्ये मोठी लष्करी किंवा राजकीय घडामोड घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!