Home » नोकऱ्या » राज्यात २७०० केंद्रप्रमुखांची भरती; ३ व ४ फेब्रुवारीला ऑनलाईन परीक्षा ! – केंद्र प्रमूख भरती २०२६

राज्यात २७०० केंद्रप्रमुखांची भरती; ३ व ४ फेब्रुवारीला ऑनलाईन परीक्षा ! – केंद्र प्रमूख भरती २०२६

Facebook
Twitter
WhatsApp
65 Views

राज्यात २७०० केंद्रप्रमुखांची भरती; ३ व ४ फेब्रुवारीला ऑनलाईन परीक्षा ! – केंद्र प्रमूख भरती २०२६

 

अडीच वर्षांपासून रखडलेली जिल्हा परिषदेच्या शाळांवरील २७०० केंद्रप्रमुखांची भरती होत आहे. त्यासाठी ३ व ४ फेब्रुवारी रोजी राज्यभरातील ४५ हजार उमेदवार ऑनलाईन परीक्षा देणार आहेत.

वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित ही परीक्षा असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ‘TET’ च्या आदेशानंतर ही पदोन्नती थांबली आहे. दरम्यान, आता सरळसेवेतून केंद्रप्रमुखांची परीक्षा होणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. अनेक परीक्षार्थी शिक्षकांना जिल्हा परिषद निवडणुकीची ड्युटी आली आहे, त्यांनी परीक्षेची तारीख पुढे ढकलावी किंवा इलेक्शन ड्युटी रद्द व्हावी, अशी मागणी केली आहे. मात्र, ज्या शिक्षकांना (केंद्रप्रमुख पदाची परीक्षा देणारे) इलेक्शन ड्युटी आली आहे, त्यांनी ३ फेब्रुवारीला परीक्षा द्यावी, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे. परीक्षा अडीच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होत असल्याने तारीख बदलणार नाही, असेही परिषदेकडून सांगण्यात आले आहे. अडीच वर्षांपूर्वी सुमारे सव्वाचार कोटींचे परीक्षा शुल्क भरले होते, त्या उमेदवारांची आता परीक्षा होत आहे.

या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षेची माहिती येथे तपासा…!! सर्व अपडेट्स आम्ही या टेलिग्राम वर प्रकाशित करत राहू, तेव्हा लगेच जॉईन करा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

‘टीईटी’ उत्तीर्णशिवाय नियुक्ती नाहीच

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवर नियुक्त शिक्षकांना (वयाच्या ५३ वर्षांपर्यंतचे सगळे शिक्षक) दोन वर्षांत ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. आता केंद्रप्रमुखांसाठी परीक्षा होणार असून निकालानंतर गुणवत्ता यादीनुसार रिक्त जागांवर उमेदवारांच्या केंद्रप्रमुख म्हणून निवडी होतील. मात्र, ते उमेदवार ‘टीईटी’ उत्तीर्ण असणे बंधनकारक असणार आहे. तुर्तास, परीक्षे देण्यासाठी ‘टीईटी’ बंधनकारक नसल्याने अर्ज केलेल्या सर्वांनाच परीक्षा देता येणार आहे.

केंद्रप्रमुखांची पदे रिक्त, शाळा भेटीच नाहीत

जिल्हा परिषदांच्या आठ-दहा शाळांचे एक केंद्र करुन त्यासाठी एक केंद्रप्रमुख पद निर्माण केले आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांना नियमित भेटी देऊन शिक्षकांच्या कामकाजावर लक्ष ठेवणे, विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी केंद्रप्रमुखांची आहे. मात्र, राज्यात ६० टक्क्यांहून अधिक केंद्रप्रमुखांची पदे रिक्त असल्याने गुणवत्ता सोडा, शाळांना नियमित भेटी देखील ४० टक्के केंद्रप्रमुखांना देता येत नाहीत, अशी सद्य:स्थिती आहे.

 

Kendra Pramukh News 2025: The Maharashtra State Examination Council has announced the Group Resource Centre Coordinator (Center Head) Limited Departmental Competitive Exam 2025. This examination is specifically for trained graduate teachers (Primary) and trained teachers (Primary) currently working under various Zilla Parishads across the state. The exam will be conducted in December 2025 at multiple centers in Maharashtra. A total of 2,410 vacancies for the post of Group Resource Centre Coordinator will be filled through this internal departmental selection process. The pay scale for the post falls under S-15, ranging from ₹41,800 to ₹1,32,300. This examination provides an important promotional opportunity for eligible in-service teachers working in Zilla Parishad schools. The last date to submit the online application is 1 January 2026, and candidates are advised to complete the process within the given deadline.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ जाहीर केली आहे. ही परीक्षा राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत असलेल्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) आणि प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) यांच्यासाठी आयोजित करण्यात येत आहे. डिसेंबर २०२५ मध्ये महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेद्वारे समूह साधन केंद्र समन्वयक या पदासाठी एकूण २,४१०रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे. संबंधित पदासाठी वेतनश्रेणी एस-१५ म्हणजेच ४१,८०० ते १,३२,३०० रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत आणि पात्र असलेल्या शिक्षकांसाठी ही अंतर्गत पदोन्नतीची महत्त्वाची संधी आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १ जानेवारी २०२६ असून पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

परीक्षा योजना:-१ परीक्षेचे टपेः- एक लेखी परीक्षा –२ परीक्षेचे स्वरूपः- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी३ प्रश्नपत्रिका:- एक४ एकुण गुण:- २००

निवड प्रक्रिया :-

१ लेखी परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल.

२ जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.

३ भरती प्रक्रियेदरम्यान अंतिम शिफारस यादी / निवड यादी तयार करतांना समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांचे क्रमांकन / प्राधान्य क्रमवारी सा.प्र.वि. शासन निर्णय दि. ०५/१०/२०१५, शासन पूरकपत्र दि. ०२/१२/२०१७ तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार निश्चित करण्यात येईल.

परीक्षेचे शुल्क :

१. सर्व संवर्गातील उमेदवारः रु. ९५०/-

२. दिव्यांग उमेदवारः रु. ८५०/-

३. परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.

४. उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.

५. विहित मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करु न शकलेल्या उमेदवारांचा संबंधित परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही.

How To Apply For Maharashtra Kendra Pramukh Bharti 2025

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज सादर करतांना उमेदवाराने स्वत:चा शालार्थ आयडी अचूकपणे नमूद करणे अनिवार्य आहे.

ऑनलाईन पध्दतीने परीक्षा परिषदेस सादर केलेल्या अर्जाच्या प्रतीसह अर्ज केल्याबाबतची माहिती उमेदवाराने स्वतः आपल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा परिषदेस कळविणे आवश्यक आहे.

सदर लिंक अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक 01/01/2026रोजी पर्यंत सुरु राहील.

त्यानंतर सदर लिंक बंद केल्या जाईल. त्यामुळे विहित मुदतीत अर्ज सादर करण्याची जबाबदारी ही उमेदवारांची राहील.

ऑनलाईन अर्ज करण्याची लिक खाली दिलेली आहे, अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावा.

विहीत पध्दतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी

Recruitment of Cluster Resource Center Co-ordinator (Cluster Head)

Important Events

Dates

Commencement of online registration of application

25/10/2025

Closure of registration of application

01/01/2026

Closure for editing application details

01/01/2026

Last date for printing your application

16/01/2026

Online Fee Payment

25/10/2025 to 01/01/2026

अर्ज करा

जाहिरात

 

Maharashtra Kendra Pramukh Bharti Updates 2025

राज्य परीक्षा परिषदेतर्फे समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) पदासाठीची परीक्षा पुन्हा पुढे ढकलली आहे. परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दि. १ ते ५ डिसेंबर या कालावधीत ही परीक्षा घेतली जाणार होती. मात्र, तांत्रिक आणि प्रशासकीय कारणास्तव ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील समूह साधन केंद्रातील (केंद्रशाळा) समूह साधन केंद्र समन्वयकांच्या (केंद्रप्रमुख) २ हजार ४१० पदांसाठी राज्य परीक्षा परिषदेने ‘समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५’ ही परीक्षा घेण्याचे जाहीर केले होते. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी परीक्षा परिषदेने १० नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली होती. परीक्षा परिषदेने २०२३मध्येही केंद्रप्रमुख पदासाठी ही परीक्षा आयोजित केली होती. त्या वेळीही शिक्षक उमेदवारांनी अर्ज भरून नोंदणी केली होती. मात्र, तांत्रिक कारणास्तव त्या वेळीही परीक्षा होऊ शकली नव्हती. त्यामुळे एकच परीक्षा दोन वेळा पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

केंद्रप्रमुख पदासाठी १ ते ५ डिसेंबर या कालावधीत आयोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले. काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणास्तव परीक्षेचे आयोजन जानेवारी-फेब्रुवारीमध्ये करण्याचे नियोजित असून, परीक्षेच्या सुधारित तारखा यथावकाश परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंत देण्यात आलेली मुदत १ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांचा अनुभव, शैक्षणिक पात्रता ही १ जानेवारी २०२६ रोजीची अंतिम समजण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Educational Qualification For Maharashtra Shikshak Recruitment 2023

पदाचे नाव

शैक्षणिक पात्रता

केंद्रप्रमुख

1. फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा., म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.

2. जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए. / बी. कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.

किंवा

1. प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे, त्या दिनांकापासून ३ वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.

2. विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत कमाल वयोमर्यादा ५० वर्ष राहील.

Salary Details For MSEC Pune Bharti

पदाचे नाव

वेतनश्रेणी

केंद्रप्रमुख

Rs.41,800/- to Rs.1,32,300/-

How To Apply For Maharashtra Shikshak Jobs

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी

Exam Pattern – परीक्षेचे स्वरूप:-

परीक्षेचे टप्पे :– एक – लेखी परीक्षा

परीक्षेचे स्वरूप:- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

प्रश्नपत्रिका :– एक

एकुण गुण:– २०० लेखी परीक्षेची योजना व सविस्तर अभ्यासक्रम: – परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल. परीक्षेचे माध्यम गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणार नाही. सदर 200 गुणांची राहील व त्यासाठी दोन तासाचा कालावधी राहील. परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे घटक व गुणांकन राहील :-

Selection Process For Maharashtra State Examination Council Pune Recruitment

लेखी परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल

जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही

भरती प्रक्रियेदरम्यान अंतिम शिफारस यादी / निवड यादी तयार करतांना समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांचे क्रमांकन / प्राधान्य क्रमवारी सा.प्र.वि. शासन निर्णय दि. ०५/१०/२०१५, शासन पूरकपत्र दि. ०२/१२/२०१७ तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार निश्चित करण्यात येईल.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!