Home » मनोरंजन » 200 कोटी बजेट, 3 मोठे सुपरस्टार, पण थिएटरमध्ये कोणीच नाही, 2025 चा सर्वात मोठा फ्लॉप, कमाई फक्त 44 कोटी

200 कोटी बजेट, 3 मोठे सुपरस्टार, पण थिएटरमध्ये कोणीच नाही, 2025 चा सर्वात मोठा फ्लॉप, कमाई फक्त 44 कोटी

Facebook
Twitter
WhatsApp
52 Views

200 कोटी बजेट, 3 मोठे सुपरस्टार, पण थिएटरमध्ये कोणीच नाही, 2025 चा सर्वात मोठा फ्लॉप, कमाई फक्त 44 कोटी

 

भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या मोठे बजेट, भव्य सेट्स आणि सुपरस्टार कलाकारांची फौज असलेले चित्रपट प्रेक्षकांना आवडतात असा समज झाला आहे. पण हा समज या चित्रपटाने दूर केला आहे.

2025 साली प्रदर्शित झालेल्या तेलुगू चित्रपट ‘कन्नप्पा’ बाबतीतही असंच काहीसं घडलं. तब्बल 200 कोटी रुपयांच्या भव्य बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाकडून साऊथ आणि बॉलिवूडमध्ये इतिहास घडेल अशी जोरदार चर्चा होती. मात्र, चित्रपट प्रदर्शित होताच या चित्रपटाने सर्वांनाच धक्का दिला.

‘कन्नप्पा’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत विष्णु मंचू दिसले, मात्र खरी चर्चा होती ती दमदार कॅमिओ भूमिकांची. पॅन इंडिया सुपरस्टार प्रभास, मल्याळम चित्रपटसृष्टीतील महानायक मोहनलाल आणि बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हे तिन्ही दिग्गज कलाकार एकाच चित्रपटात झळकणार असल्याने प्रेक्षकांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या होत्या. पडद्यावर हे तिन्ही सुपरस्टार एकत्र दिसल्यावर थिएटरमध्ये जल्लोष होईल अशी अपेक्षा बांधली होती. पण दुर्दैवाने चित्रपटाची कथा आणि जुना मांडणीमुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

यामुळे फ्लॉप झाला चित्रपट?

चित्रपट अपयशी ठरण्यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे त्याची स्क्रिप्ट आणि त्याची मांडणी. 200 कोटी रुपये खर्च करूनही चित्रपटातील VFX आणि स्पेशल इफेक्ट्स प्रेक्षकांना भारावून टाकू शकले नाहीत. आजचा प्रेक्षक ‘बाहुबली’, ‘कांतारा’ आणि अशा भव्य सिनेमांचा अनुभव घेऊन आला आहे. त्यामुळे सादरीकरणात जर किंचितही चूक झाली तर प्रेक्षक चित्रपट नाकारायला वेळ लावत नाहीत हे ‘कन्नप्पा’च्या बाबतीत स्पष्टपणे दिसून आलं.

चित्रपट रिलीज होताच पहिल्या दिवसापासूनच त्याच्या कमाईत घसरण पाहायला मिळाली. मोठ्या प्रमाणावर प्रमोशन, सुपरस्टार्सची उपस्थिती असूनही अनेक ठिकाणी सिनेमागृहांमध्ये शुकशुकाट होता. 200 कोटींचा खर्च वसूल करण्याचं स्वप्न पाहणारा ‘कन्नप्पा’ आपल्या बजेटच्या निम्म्या रकमेपर्यंतही पोहोचू शकला नाही.

क्रिटिक्सकडूनही चित्रपटाला नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या ज्याचा थेट परिणाम त्याच्या बॉक्स ऑफिस कामगिरीवर झाला. विष्णु मंचू यांच्या ‘कन्नप्पा’ ने जगभरात फक्त 44 कोटी रुपयांची कमाई केली. ‘कन्नप्पा’च्या अपयशातून पुन्हा एकदा हेच स्पष्ट झालं आहे की, केवळ मोठे बजेट आणि सुपरस्टार असून चालत नाही. मजबूत कथा, प्रभावी मांडणी आणि दर्जेदार सादरीकरणाशिवाय प्रेक्षकांना थिएटरकडे खेचणं आजच्या काळात अशक्य आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!