Home » नोकऱ्या » पोस्टात 28 हजार पदांची ‘मेगाभरती’, कोणतीही लेखी परीक्षा नाही, मुलाखतही घेतली जाणार नाही

पोस्टात 28 हजार पदांची ‘मेगाभरती’, कोणतीही लेखी परीक्षा नाही, मुलाखतही घेतली जाणार नाही

Facebook
Twitter
WhatsApp
76 Views

पोस्टात 28 हजार पदांची ‘मेगाभरती’, कोणतीही लेखी परीक्षा नाही, मुलाखतही घेतली जाणार नाही

 

देशातील बेरोजगार आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय टपाल विभागाने 2026 साठी ग्रामीण डाक सेवक म्हणजेच जीडीएस भरती मोहीम जाहीर केली आहे. या भरती मोहीम अंतर्गत देशभरात तब्बल 28 हजार पदांची भरती केली जात आहे.

देशभरातील एकूण 23 पोस्टल सर्कलमध्ये ही भरती केली जाणार असून या भरती अंतर्गत एकूण 28 हजार 740 पदे भरली जाणार आहेत. या परीक्षेसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. उमेदवाराची निवड केवळ दहावीच्या गुणांवर केली जाणार आहे. या पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे.

या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असावा. त्याला संगणकाचे ज्ञान असावे तसेच सायकल चालवता आली पाहिजे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएसच्या उमेदवाराला 100 रुपये फी तर एससी, एसटी आणि महिलांना कोणतीही फी भरावी लागणार नाही. निवड झालेल्या उमेदवाराला पदानुसार, वेगवेगळे वेतन दिले जाईल. जीडीएस आणि एबीपीएममध्ये निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 10 हजार ते 24 हजार 470 रुपये तर बीपीएमसाठी निवड झालेल्या उमेदवाराला 12 हजार ते 29 हजार 380 रुपये दरमहा वेतन दिले जाईल. जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही मोठी संधी निर्माण झाली आहे. कमी शिक्षण असूनही सरकारी नोकरीची संधी तरुणांना मिळणार आहे. तसेच नोकरी मिळवण्यासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. तसेच मुलाखतसुद्धा घेतली जाणार नाही. केवळ 10 वीच्या गुणवत्तेवर ही नोकरी तरुणांना मिळू शकणार आहे.

कोणत्यापदांसाठीभरती?

या भरती अंतर्गत ग्रामीण डाक सेवक (जीडीएस), शाखा पोस्ट मास्टर (बीपीएम) आणि सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर (एबीपीएम) या पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज सुरू झाले असून अर्ज करणारा उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराची निवड ही दहावीच्या गुणांवर आधारित असणार आहे. उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्षे पूर्ण केलेले असावे. तसेच जास्तीत जास्त 40 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

कसाकरालपदासाठीअर्ज?

सर्वात आधी indiapostgdsonline.gov.in या इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. वेबसाईट ओपन झाल्यानंतर होम पेजवरील जीडीएस भरती 2026 लिंकवर क्लिक करा. त्यानंतर सविस्तर नोंदणी करून एक नवीन लॉगीन आयडी तयार करा. सर्वात आधी व्यवस्थित अर्ज वाचून घ्या. त्यानंतर व्यवस्थित अर्ज भरा. सांगितल्यानुसार, सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अर्ज शुल्क ऑनलाइन भरा. फॉर्म सबमिट करा. अर्ज भरल्याची खात्री करून घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!