Home » राजकारण » शरद पवारांचा दिल्ली दौरा अचानक रद्द; थेट बारामती गाठणार, कारण अद्याप अस्पष्ट

शरद पवारांचा दिल्ली दौरा अचानक रद्द; थेट बारामती गाठणार, कारण अद्याप अस्पष्ट

Facebook
Twitter
WhatsApp
34 Views

शरद पवारांचा दिल्ली दौरा अचानक रद्द; थेट बारामती गाठणार, कारण अद्याप अस्पष्ट

 

बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सर्व पवार परिवार बारामतीमध्ये दाखल झाला होता. दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू होतं त्यावेळीच अजित पवारांचे अपघाती निधन झाले, त्यानंतर दोन दिवसांपूर्वी देशाच्या अर्थसंकल्प सादर होणार यासाठी खासदार सुप्रिया सुळे दिल्लीला रवाना झाल्या.

त्यांनी दिल्लीला निघण्याआधी अजित पवारांच्या आई आशाताई पवार यांची भेट घेतली, त्यांच्यांशी चर्चा केली आणि त्या दिल्लीला रवाना झाल्या, त्यानंतर बारामतीवरून मुंबईला रवाना होण्यापूर्वी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांनी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान परिसरात, जिथे अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते, त्या स्थळाला भेट दिली. तेथे त्यांनी विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांच्याशी अजित पवारांच्या नियोजित स्मृतीस्थळासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर ते मुंबईला रवाना झाले, मुंबईतून ते दिल्लीला जाणार होते, मात्र, त्यांचा दिल्ली दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे.

शरद पवारांचा होणार दिल्लीचा दौरा रद्द

आज शरद पवारांचा होणार दिल्लीचा दौरा रद्द झाला असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार थोड्याच वेळात पुण्याला जाणार असून त्यानंतर बारामतीला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, या दौऱ्याच्या मागचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन कामकाजात शरद पवार सहभागी होणार होते. दोन दिवस संसदीय कामकाजात सहभाग घेतल्यानंतर पुन्हा बारामतीला जाणार होते, मात्र त्यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या चौथ्या दिवशीच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर त्या बारामतीत परतल्या, नंतर काल त्यांनी कराड आणि सातारा दौरा केला, यावेळी त्यांनी अजित पवारांसोबत अपघातात निधन झालेले सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांच्या घरी भेट दिली. हा त्यांना पहिलाच दौरा होता. तर दुसरीकडे शनिवारी, दुपारनंतर सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या आई आशाताईंची भेट घेऊन त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीला रवाना झाल्या, त्यानंतर शरद पवार देखील मुंबईला गेले.

अजित पवारांच्या लेकाची डोळे पाणावणारी पोस्ट

अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांची एक पोस्ट व्हायरल होत आहे. जय पवार यांनी आपल्या व्हॉटसअॅप स्टेटसला वडिलांसोबतचे दोन फोटो ठेवले आहेत. यासोबत जय पवार यांनी काही मजकूरही लिहला आहे. यामध्ये म्हटले आहे की, “तुमची खूप आठवण येतेय. डॅड काश वेळ थांबली असती, मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो. मिसिंग यू अ लॉट डॅड!”, असे जय पवार यांनी म्हटले. जय पवार यांच्या या स्टेटसचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अजित पवार हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी बारामती येथे येत असताना 28 जानेवारीला त्यांच्या विमानाचा अपघात झाला होता. विमान धावपट्टीवर उतरताना कोसळले होते. यानंतर विमानाचा प्रचंड स्फोट होऊन अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला होता. अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर मोठा आघात झाला होता. 29 जानेवारीला अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान येथील मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीमध्ये प्रचंड गर्दी झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!