Home » ताज्या बातम्या » बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही? सरकारी महिला कर्मचारी गिरीश महाजनांवर भडकली, म्हणाली, ‘सस्पेंड केलं तरी चालेल, पण…

बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही? सरकारी महिला कर्मचारी गिरीश महाजनांवर भडकली, म्हणाली, ‘सस्पेंड केलं तरी चालेल, पण…

Facebook
Twitter
WhatsApp
43 Views

 

बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही? सरकारी महिला कर्मचारी गिरीश महाजनांवर भडकली, म्हणाली, ‘सस्पेंड केलं तरी चालेल, पण…

नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिन सोहळ्यादरम्यान वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याने मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

आज संपूर्ण देशात 77 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2026) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सकाळपासून विविध ठिकाणी मंत्री, पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी ध्वजारोहन करून प्रजासत्ताक दिन साजरा केला. मात्र, नाशिकमध्ये या उत्सवाला वेगळेच वळण लागले असून, मंत्री गिरीश महा यांच्या भाषणादरम्यान अचानक गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे.

 

नाशिकमध्ये आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन भाषण करत असताना त्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे नाव न घेतल्याचा आरोप करत एका महिला कर्मचाऱ्याने थेट त्यांना जाब विचारला. या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचे नाव माधवी जाधव असून त्या वन विभागात कार्यरत असल्याची माहिती आहे. त्यांनी जाब विचारताच उपस्थित पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

 “सस्पेंड केलं तरी चालेल, पण…”

घटनास्थळी झालेल्या वादानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना माधवी जाधव म्हणाल्या की, “मंत्र्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही. ज्यांनी संविधान दिले, लोकशाही घडवली, त्या व्यक्तीचे नाव वगळणे ही फार मोठी चूक आहे. मला सस्पेंड केलं तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही.” त्या पुढे म्हणाल्या, “मी मीडियाशी देणं-घेणं ठेवत नाही. मला वाळूच्या गाड्या उतरवायला लावल्या, मातीचं काम दिलं तरी मी करेन. पण बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही. त्यांनी आपली चूक स्वीकारावी,” असे देखील त्यांनी म्हटले.

 “बाबासाहेबांचं नाव भाषणात का नाही घेतलं?”

माधवी जाधव यांनी पुढे सांगितले की, “बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल, याची मी वाट पाहत होते. पण बाबासाहेबांचं नाव भाषणात आलं नाही. लोकशाही आणि संविधानाला कारणीभूत नसलेल्या लोकांची नावं वारंवार घेण्यात आली. मग संविधानाचा आणि प्रजासत्ताक दिनाचा जो खरा मानकरी आहे, त्याचं नाव भाषणात का नाही?” असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, या घटनेनंतर कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी माधवी जाधव यांना ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!