ए मारतेस काय.. देऊ काय ? बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टन्सीवरून जोरदार राडा, पापडावरून स्पर्धक चवताळले
बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धकांमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून वादविवाद भांडण पाहायला मिळत आहेत. भांडण शिवीगाळ हे तर सुरूच आहे पण आता बिग बॉसच्या घरातील भांडणं ही टोकाला जाताना दिसतात.
घरातील हा चौथा आठवडा सुरू आहे. कॅप्टनसीचा टास्क घरात रंगणार आहे. प्राजक्ता शुक्रेनंतर बिग बॉसच्या घरातील दुसरा कॅप्टन कोण होणार? याकडे चाहत्यांचे लक्ष आहे. दरम्यान कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये कॅप्टनसीच्या टास्क वरून जोरदार राडा झाल्याचं दिसतंय . काल नॉमिनेशन झालं, आज कॅप्टनसीचा टास्क आहे. प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे की, सर्व स्पर्धकांना पापडाचा टास्क देण्यात आला आहे. व्हिडिओत दोन टीम पापड लाटताना दिसत आहेत. कुणी एकमेकांचे पीठ पळवतंय तर एकमेकांच्या अंगावर पीठ फेकले जात आहे.
पापडासाठी बिग बॉसच्या घरात राडा
बिग बॉसच्या घरात कॅप्टनसीच्या टास्कसाठी स्पर्धक आक्रमक रूपात दिसतायत. कुणी कुणाला पकडून ठेवला आहे तर एक टीम दुसऱ्या टीमचे पापड पळवताना दिसत आहे. दरम्यान ए मारतेस काय .. देऊ का ? असं करण सोनावणे म्हणताना दिसत आहे. रुचिता जामदार आणि करण सोनवणे यांच्यात झटपट झाल्याचं दिसणार आहे. टास्कमध्ये रुचिताच्या डोक्यावर करणने पीठ ओतलं. त्यानंतर रुचिताने त्याला झापड ठेवून दिली. रुचिताने मारताच करणही चवताळला. रुचिताने हात उभारताचं करणचा पारा चढला होता. तोही तिला मारायला गेल्याच दिसलं. इमारतेस काय देऊ का असं मोठ्याने ओरडत त्याने हात उचलल्याच दिसलं.
त्या दोघांचा पारा चढलेला बघून बिग बॉसच्या घरातील इतर सदस्य ही तिथे येतात. दोघांना रोखण्याचा प्रयत्न करतात. विशाल करणला रोखून शांत करताना दिसत आहे. आता बिग बॉसच्या घरात कॅप्टनसी उमेदवारीचे पापड लाटले जाणार की त्यांचा चक्काचूर होणार ? हे आजच्या भागात पाहणं रंजक ठरणार आहे.






