Home » ताज्या बातम्या » पवार कुटुंब मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? शरद पवारांची पार्थ आणि जय पवारांसोबत महत्त्वाची बैठक, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

पवार कुटुंब मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? शरद पवारांची पार्थ आणि जय पवारांसोबत महत्त्वाची बैठक, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

Facebook
Twitter
WhatsApp
98 Views

पवार कुटुंब मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? शरद पवारांची पार्थ आणि जय पवारांसोबत महत्त्वाची बैठक, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

 

बारामतीः राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिवंगत अजित पवार यांनी आमच्यासोबत याबाबत चर्चा केली नसल्याचं सांगितल्याने हे दोन्ही नेते विलीनीकरणाला फारसे उत्सुक नसल्याचं बोललं जात आहे.

मात्र असं असताना बारामतीत वेगळ्या राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज विद्या प्रतिष्ठानमध्ये संस्थेची एक बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार, जय पवार आणि संस्थेचे इतर विश्वस्त उपस्थित होते. मात्र यावेळी शरद पवार यांची पार्थ आणि जय पवारांसह एक स्वतंत्र बैठक झाल्याची माहिती आहे. त्यामुळे विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तांसह घेतलेल्या बैठकीत जरी संस्थेविषयी चर्चा झाली असली तरी नंतर शरद पवार आणि अजित पवारांच्या दोन्ही पुत्रांमध्ये झालेल्या स्वतंत्र बैठकीत राजकीय चर्चा झाली असण्याची दाट शक्यता आहे.सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर शरद पवारांनी बारामती इथं पत्रकार परिषद घेत आपल्याला या शपथविधीबद्दल माहिती नसल्याचं सांगत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर तातडीने पार्थ पवार यांनी गोविंदबाग इथं जाऊन शरद पवारांसह पवार कुटुंबातील अन्य सदस्यांची भेट घेत चर्चा केली. या भेटीनंतर पवार कुटुंबातील दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकदा संवाद प्रस्थापित झाल्याचे समजते. कारण अजित पवारांचे विश्वासू साथीदार राहिलेल्या किरण गुजर यांनी मोठा खुलासा केला होता. दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण ही अजित पवारांची इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण करण्याचं काम आता पार्थ पवार यांच्याकडून होणार आहे. पवार कुटुंबातील सर्व सदस्य यासाठी सकारात्मक आहेत, अशी माहिती गुजर यांनी दिली होती. त्यामुळे आज पुन्हा एकदा शरद पवार यांची पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासोबत बैठक झाल्याने विलीनीकरणाची चर्चा पुढे गेली असण्याची शक्यता आहे.दरम्यान, या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत अद्याप तरी राष्ट्रवादीकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.किरण गुजर नेमकं काय म्हणाले होते?प्रदेश पातळीवरील नेते काहीही म्हणत असतील तरी पवार कुटुंबाने एकत्र येण्याचं ठरवलं आहे, असा दावा किरण गुजर यांनी सुनेत्रा पवारांच्या शपथविधीच्या दिवशीच केला होता. “पार्थ पवार यांनी आज शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबाच्या भेटीत शपथविधी सोहळ्यावरून निर्माण झालेले सर्व समज-गैरसमज दूर केले. तसंच पवार कुटुंबाने आता राजकीदृष्ट्या एकत्र येण्याचा निर्णय घेतला असून मी सहयोग निवासस्थानी पार्थ पवारांची पुन्हा भेट घेत तिथं त्यांच्याबरोबर चर्चा केली. यावेळी अजित पवारांचे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे स्वप्न कोणत्याही परिस्थितीत साकार करायचं, असं आम्ही ठरवलंय. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणारच,” असं किरण गुजर म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!