5 दिवसांच्या घसरणीनंतर सोनं-चांदीचा जोरदार कमबॅक! सोनं 4% तर चांदी 6% महागली, पाहा आजचा भाव
अलीकडच्या काही दिवसांत सोन्याचे भाव सातत्याने घसरत होते. मात्र आता सोन्याने जोरदार पुनरागमन केले आहे. बाजारातील आकडेवारीनुसार, सलग चार दिवसांच्या तीव्र घसरणीनंतर सोन्याच्या भावात मोठी वाढ नोंदवली गेली आहे.
आज सराफा बाजारात सोनं तब्बल 6,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 40,000 रुपयांनी महागली आहे तर MCX बाजारात सोनं 4% आणि चांदी 6 टक्क्यांनी वाढली आहे.
Goodreturns च्या आकडेवारीनुसार, आज राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,60,680 आहे, तर 22 कॅरेट सोनं 1,47,300 प्रति 10 ग्रॅम या भावाने मिळत आहे.
चांदीचा भाव
देशभरात चांदीने पुन्हा आपली तेजी पकडली असून आज चांदी 40,000 रुपये प्रति किलोने महागली आहे. आज राजधानी दिल्लीत चांदीचा भाव प्रति किलो 3,20,000 रुपये झाला आहे.
COMEX वर सोने-चांदी 2% पेक्षा जास्त वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सकाळच्या व्यवहारात COMEX वरील सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये 2% पेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली. COMEX गोल्डचा भाव $5,039.05 प्रति औंस या उच्चांकावर पोहचला आहे.
MCX भाव
MCX एप्रिल डिलिव्हरीच्या सोन्याचा भाव जवळपास 7,000 रुपयांनी म्हणजेच सुमारे 4% पेक्षा जास्त वाढून 1,60,755 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे तर MCX मार्च डिलिव्हरीची चांदी 16,000 रुपयांनी म्हणजेच 6% पेक्षा जास्त वाढून 2,84,094 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.
महाराष्ट्रात सोनं-चांदीचा भाव
राज्यात जवळपास सर्व शहरांत सोनं-चांदीचा भाव एकसारखाच आहे.
24 कॅरेट सोनं प्रति तोळा – 1,60,530 रुपये
22 कॅरेट सोनं प्रति तोळा – 1,47,150 रुपये
18 कॅरेट सोनं प्रति तोळा – 1,20,000 रुपये
चांदी प्रति किलो – 3,20,000 रुपये






