डॉलरची ताकद आणि रुपयाची घसरण
अलीकडच्या काळात अमेरिकी डॉलर सतत मजबूत होताना दिसत आहे, तर आपला रुपया त्याच्याविरुद्ध कमकुवत होत आहे. अनेकांना प्रश्न पडतो, की डॉलर फक्त रुपयाविरुद्धच वाढतो आहे का?
प्रत्यक्षात डॉलर अनेक चलनांविरुद्ध मजबूत आहे, पण रुपयावर त्याचा परिणाम अधिक तीव्र जाणवतो. यामागील कारणे समजून घेणे महत्त्वाचे आहे-
१. सर्वांत मोठे कारण म्हणजे अमेरिकेतील उच्च व्याजदर. अमेरिकेत व्याजदर जास्त असल्याने जागतिक गुंतवणूकदारांना सुरक्षित आणि निश्चित परतावा मिळतो. त्यामुळे ते अमेरिकी सरकारी रोखे आणि डॉलरमधील गुंतवणुकीकडे वळतात. डॉलरची मागणी वाढली, की तो मजबूत होतो. जगात अस्थिरता, युद्धसदृश परिस्थिती किंवा आर्थिक मंदीची भीती वाढली, की गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधतात आणि डॉलरला सुरक्षित आश्रय मानले जाते.
२. डॉलरची आणखी एक ताकद म्हणजे जागतिक व्यापारातील त्याचे वर्चस्व. कच्चे तेल आणि अनेक महत्त्वाच्या वस्तूंची देवाणघेवाण डॉलरमध्येच होते. त्यामुळे डॉलरची मागणी नैसर्गिकरित्या कायम राहते.
सुरक्षित चलन म्हणून डॉलर
डॉलरची मागणी- रुपयाची घसरण- एफआयआय आणखी घाबरतात- आणखी विक्री- एफआयआय विक्री
जागतिक तणाव, युद्ध, आर्थिक मंदीची भीती असेल तर गुंतवणूकदार जोखीम टाळतात. डॉलरला सुरक्षित आश्रय मानले जाते. म्हणून:
पैसा उदयोन्मुख देशांतून बाहेर
डॉलरकडे ओघ
डॉलर मजबूत
इतर चलने का स्थिर दिसतात?
काही देशांमध्ये:
मोठा व्यापार अधिशेष आहे (उदा. निर्यात जास्त आणि आयात कमी)
चलनावर सरकार वा मध्यवर्ती बँक कठोर नियंत्रण ठेवते.
डॉलरची मागणी तुलनेने कमी आहे. म्हणून त्यांची घसरण कमी दिसते.
भारतीय शेअर बाजारावर परिणाम
नकारात्मक परिणाम
१. ‘एफआयआय’ची विक्री वाढते
परदेशी गुंतवणूकदारांसाठी, रुपयाची घसरण म्हणजे थेट त्यांच्या कमाईला लागलेला कर आहे. समजा, एखाद्या ‘एफआयआय’ने भारतीय शेअर बाजारामध्ये १० टक्के नफा कमावला, परंतु याच काळात रुपया ५ टक्क्यांनी घसरला, तर डॉलरमध्ये त्यांचे उत्पन्न निम्मे होते. यामुळे त्यांना भारतात गुंतवणूक करणे तोट्याचे वाटू लागते.
२. आयातदार कंपन्यांचा खर्च वाढतो
तेल कंपन्या
विमान कंपन्या
इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक यांच्या नफ्यावर परिणाम
आयातदार कंपन्यांचा खर्च वाढतो
३. महागाई वाढू शकते महागाई वाढली तर…
व्याजदर कमी होण्याची शक्यता कमी
बाजाराला आधार कमी
१. सकारात्मक परिणाम
कारण त्यांची कमाई डॉलरमध्ये असते.
रुपया कमकुवत = रुपयातील नफा जास्त
२. निर्यात करणाऱ्या कंपन्यांना फायदार
सायन, कापड, ऑटो क्षेत्रे मजबूत होऊ शकतात.
निष्कर्ष
डॉलरची मजबुती ही जागतिक आर्थिक परिस्थितीचे प्रतिबिंब आहे. मात्र, भारताच्या व्यापार तुटीमुळे आणि परकी भांडवलावर अवलंबित्वामुळे रुपयावर अधिक दबाव येतो. परिस्थिती बदलती असते. जागतिक व्याजदर कमी झाले किंवा परकी गुंतवणूक परत आली, तर रुपयाला आधार मिळू शकतो. तोपर्यंत संयम आणि संतुलित गुंतवणूक हाच योग्य मार्ग आहे.
रुपया जास्त का घसरतो?
डॉलर मजबूत असताना सर्व चलनांवर परिणाम होतो.;पण रुपया जास्त संवेदनशील असतो कारण –
भारताची व्यापार तूट जास्त
आपण आयात जास्त आणि निर्यात कमी करतो.
जास्त डॉलर लागतात
रुपया दबावाखाली.
कच्च्या तेलावर अवलंबित्व
तेल महाग = जास्त
डॉलरची मागणी = रुपया कमकुवत.
परकी गुंतवणूकदारांची विक्री
भारतात परकी गुंतवणूक मोठी आहे.
ते पैसे काढतात डॉलरची मागणी वाढते रुपया






