Home » गुन्हा » पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची मोठी कारवाई; सापडलेल्या ग्राहकांना रस्त्यावर बसवलं आणि…, कोम्बिंग ऑपरेशनने खळबळ

पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची मोठी कारवाई; सापडलेल्या ग्राहकांना रस्त्यावर बसवलं आणि…, कोम्बिंग ऑपरेशनने खळबळ

Facebook
Twitter
WhatsApp
34 Views

पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची मोठी कारवाई; सापडलेल्या ग्राहकांना रस्त्यावर बसवलं आणि…, कोम्बिंग ऑपरेशनने खळबळ

 

बुधवार पेठ परिसरात काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या धक्कादायक प्रकाराच्या पार्श्वभूमीवर आज मध्यरात्री पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

५० हून अधिक घरांची तपासणी

बुधवार पेठ परिसरात काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या धक्कादायक प्रकाराच्या पार्श्वभूमीवर आज मध्यरात्री पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

५० हून अधिक घरांची तपासणी

पुणे: पुण्यातील बुधवार पेठ परिसरात पुणे पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे.

 

रात्री १२ ते पहाटे ३ वाजेपर्यंत झाडाझडती व कडेकोट नाकाबंदी करत पोलिसांकडून बुधवार पेठेतील ५० हून अधिक घरांची तपासणी करण्यात आली.

 

महिला पोलिसांकडून सखोल चौकशी

बुधवार पेठेतील कुंटणखान्यांमध्ये महिला पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात आली असून अमली पदार्थ, अल्पवयीन मुलींकडून जबरदस्तीने करवून घेतला जाणारा वेश्याव्यवसाय आणि बेकायदा वास्तव्य यावर आधारित ही कारवाई करण्यात आली आहे.

 

पोलिसांचा कडक बंदोबस्त

या कोम्बिंग ऑपरेशनवेळी बुधवार पेठेच्या प्रत्येक गल्लीत पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळाला.

 

नुकताच समोर आला होता धक्कादायक प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये बेकायदा राहणाऱ्या एका बांगलादेशी तरुणीच्या प्रकरणात कारवाई न केल्यामुळे फरासखाना पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला नुकतंच निलंबित करण्यात आलं होतं. संबंधित आरोपी तरुणीच्या प्रकरणातील माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना न देणे आणि यासाठी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप या महिला कर्मचाऱ्यावर होता.

 

बुधवार पेठेत आज मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन

या प्रकरणानंतर चुकीच्या गोष्टींना आळा घालण्यासाठी पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने बुधवार पेठेत आज मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याचा निर्णय घेतला.

 

फौजफाटा रात्री १२ वाजता बुधवार पेठेत दाखल

या कोम्बिंग ऑपरेशननुसार स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या विविध पथकांचा मोठा फौजफाटा रात्री १२ वाजता बुधवार पेठेत दाखल झाला.

 

सर्व प्रमुख रस्त्यांवर पोलिसांकडून नाकाबंदी

बुधवार पेठ परिसरात ये-जा करणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली होती.

 

ग्राहकांना ताब्यात घेऊन बसवलं रस्त्यावर

शुक्रवार पेठ पोलीस चौकी परिसरातील कुंटणखान्यांमध्ये महिला पोलिसांनी महिलांची चौकशी केली आणि या परिसरात आलेल्या ग्राहकांना ताब्यात घेऊन रस्त्यावर बसवलं.

 

संशयितांची कसून चौकशी

अमली पदार्थांचा वापर, जबरदस्तीने अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकलणे आणि बांगलादेशी नागरिकांचे बेकायदा वास्तव्य या मुद्द्यांवर पोलिसांनी अनेक संशयितांची कसून चौकशी केली असून पुढील कारवाई केली जात आहे.

 

ऑपरेशनमुळे शहरात खळबळ

दरम्यान, बुधवार पेठेत मध्यरात्री झालेल्या या कोम्बिंग ऑपरेशनमुळे शहरात खळबळ उडाली असून अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!