Home » ब्लॉग » केसनंद गावात स्क्रॅप दुकानांचा सुळसुळाट! दुसरं कुदळवाडी नको!”

केसनंद गावात स्क्रॅप दुकानांचा सुळसुळाट! दुसरं कुदळवाडी नको!”

Facebook
Twitter
WhatsApp
148 Views

पुण्याच्या केसनंद गावात २०-२५ अवैध स्क्रॅप दुकानं बिनधास्त सुरू! ना परवाना, ना परवानगी –ग्रामस्थ संतप्त, प्रशासन मात्र झोपेत! आता कारवाई होणार का?

  1. काही दिवसांपूर्वी कुदळवाडी परिसरात अवैध स्क्रॅप दुकानांवर कारवाई झाल्यानंतर, आता पुणेच्या पूर्व भागातील केसनंद, गावात अशाच प्रकारच्या दुकानांनी उघडपणे आपला विस्तार केला आहे. या दुकानांमुळे गावात कचऱ्याचं साम्राज्य, प्रदूषण, तसेच सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून ग्रामस्थ संतप्त आहेत. विशेष म्हणजे प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

२० ते २५ स्क्रॅप दुकानं, कुठलीच कायदेशीर परवानगी नाही

केसनंद ग्रामपंचायत हद्दीत सध्या जवळपास २० ते २५ स्क्रॅप दुकानं कार्यरत आहेत. या दुकानांना कोणतीही ग्रामपंचायतीची परवानगी, अग्निशमन दलाचा परवाना अथवा इतर कायदेशीर कागदपत्रं नाहीत, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. “हे व्यवसाय करणारे लोक गावचे नाहीतच. बाहेरून आलेले आहे.

ग्रामस्थांची संतप्त प्रतिक्रिया

या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी केसनंद ग्रामपंचायतीला निवेदन दिलं आहे. यावेळी बोलताना ग्रामस्थ कुशाल सातव म्हणाले, “गावाच्या सुरक्षिततेसाठी आम्ही वेळोवेळी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली आहे. परंतु कोणाच्याच लक्षात ही गंभीर बाब येत नाही. यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार सुरू असून स्थानिक प्रशासन हात वर करून बसले आहे.”

स्क्रॅप दुकानदाराची बिनधास्त कबुली’

या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब म्हणजे एका स्क्रॅप दुकानदार खानने दिलेली प्रतिक्रिया. त्याने स्पष्टपणे सांगितलं की, “आम्ही पोलिसांना दर महिन्याला एक किश्त देतो, त्यामुळे आम्हाला कोणतीही कायदेशीर परवानगी घ्यावी लागत नाही.” यावरूनच प्रशासन, पोलीस आणि स्थानिक दबावगटांचा सहभाग असल्याची शंका ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

प्रशासन कधी जागं होणार?

सध्या या दुकानांमुळे गावात प्लास्टिक, लोह, केमिकल यांचा उघडपणे साठा होत असून कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही. आगीचा धोका, गुन्हेगारी प्रवृत्तींना आश्रय आणि पर्यावरणाची हानी यामुळे केसनंद गाव अराजकतेच्या मार्गावर आहे.

प्रशासन यावर कधी कारवाई करणार, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरत आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!