Home » ब्लॉग » वाघोलीतील यशस्वी नेतृत्वाची तालुका पातळीवर झेप; विजय जाचक यांच्याकडे हवेली भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी

वाघोलीतील यशस्वी नेतृत्वाची तालुका पातळीवर झेप; विजय जाचक यांच्याकडे हवेली भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी

Facebook
Twitter
WhatsApp
122 Views

भारतीय जनता पक्षाने हवेली तालुक्याच्या संघटनात्मक नेतृत्वाची जबाबदारी विजय जाचक यांच्यावर सोपवली असून, त्यांची हवेली तालुका अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले, संघटनात कौशल्य असलेले आणि निवडणूक यंत्रणेतील कुशल अनुभव असलेले जाचक हे कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात.

वाघोली शहराध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी अत्यंत खंबीरपणे सांभाळत, पक्षाची संघटना खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचवली. विशेषतः लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये वाघोली परिसरातून  मिळालेलं भक्कम मताधिक्य हे त्यांच्या नियोजनशक्ती, जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालण्याच्या वृत्तीचे फलित होते.

जाचक यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने केवळ निवडणूक यशच नव्हे, तर सामाजिक प्रश्नांवर भक्कम भूमिका घेत जनतेशी नाते दृढ केले आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांच्यावर तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

हवेली तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये यामुळे नवा जोश आणि उत्साह संचारला असून, विजय जाचक यांच्या नेतृत्वात पक्ष संघटना अधिक प्रभावी, कार्यक्षम आणि लोकाभिमुख होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!