वारजे माळवाडी (पुणे) | गड किल्ले संवर्धन संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव १४ मे २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्ती पूजनाने झाली. पूजन सोहळा पुणे शहरातील सर्वभौम वृत्तपत्राचे मुख्य संपादक दीपक बलाढे, डॉ. नवनाथ कवडे, तसेच जनहित विचार मंचचे अध्यक्ष शैलेन्द्र गायकवाड यांच्या हस्ते पार पडला.
सायंकाळी ७ वाजता कु. विद्या भोपे हिने छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर प्रभावी व्याख्यान दिले. यानंतर परिसरात भव्य मिरवणूक काढण्यात आली, ज्याचे स्वागत संस्थेच्या वतीने करण्यात आले.रात्री ९ वाजता देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाची सांगता छत्रपतींची आरती व शिववंदना घेऊन करण्यात आली.
या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यामध्ये –मा. नगरसेवक सचिन दोडके, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे, युवा नेते तुषार काळे, भारत भूषण बराटे, अभिमन्यू तिखे,राष्ट्रवादी काँग्रेस पुणे उपाध्यक्ष सौ. निलीमा डोळसकर, वैशाली बनकर, मनसेचे प्रवीण सोनवणे,सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ भिलारे, पियुष शहा, अक्षय बोडके,शिव व्याख्याते ओमकार यादव, बजरंग दलाचे अनंता वाजंळे,पुणे शहर RPI उपाध्यक्ष दत्ताभाऊ चव्हाण यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे उत्सवप्रमुख गणेश भुसेकर, मोसिन मुल्ला, सागर पायगुडे, आलमशेठ पठाण, विजय साळेकर, योगेश पांचाळ, जीवन बराटे, मतई, मंजिरी मुल्ला यांनी केले.कार्यक्रमाबाबतची माहिती संस्थापक व अध्यक्ष साईनाथ जोशी यांनी दिली.