129 Views
लोणीकंदमध्ये वीजचोरी, वाघोलीत ट्रान्सफॉर्मर गहाळ.
दोन्ही प्रकरणांत महावितरणचं मौन अर्थपूर्ण.
सामान्यांवर तत्काळ कारवाई, मोठ्यांना सूट?न्याय सर्वांसाठी सारखाच आहे का, हा सवाल ऐरणीव
लोणीकंद हद्दीतील एका नावाजलेल्या क्रेशर मालकाचे तब्बल 1 कोटी 35 लाख रुपयांचं वीज बिल थकीत असतानाही, त्याने शेजारील लाईनवरून बेकायदेशीर वीज वापर सुरू ठेवली, हे महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं.
महावितरणच्या पथकाने तात्काळ पंचनामा केला, मात्र त्यानंतर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचं चित्र दिसतंय.
अनेक दिवस उलटून गेले तरी, ना गुन्हा दाखल झाला, ना वसुलीची प्रक्रिया सुरू झाली – हे सगळं ‘अज्ञात फाईल’मध्ये दबवण्यात आलंय का? असा सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे.
सामान्य नागरिकाचं काहीशे रुपयांचं बिल थकलं तरी वीज तात्काळ तोडणारी महावितरण यंत्रणा, कोट्यवधींच्या थकबाकीदारांबाबत मात्र गप्प का? हा प्रश्न संतापजनक आहे.
या प्रकरणात कायदेशीर कारवाई अपेक्षित असताना, उलट गोष्टी गुप्त ठेवल्या जात असल्याची चर्चा आहे.
वाघोलीत ट्रान्सफॉर्मर प्रकरण – माहिती गुप्त, संशय ठळक
वाघोली विभागात तिन्ही ट्रान्सफॉर्मर गायब झाल्याच्या चर्चेनंतर एक ट्रान्सफॉर्मर चोरीला गेला म्हणून तक्रार दाखल झाली.
उरलेले दोन ट्रान्सफॉर्मर सापडल्याची माहिती मिळाली, पण ते नेमके कुणाकडे सापडले, यावर महावितरणने मौन बाळगले आहे.
ही माहिती लपवण्यामागे कोणाला वाचवायचं आहे?
महत्त्वाच्या गोष्टींबाबत पारदर्शकता टाळून, दोषींना संरक्षण दिलं जातंय का?
महावितरण सामान्य नागरिकांवर तत्परतेने गुन्हे दाखल करत असताना, अशा गंभीर आर्थिक गैरव्यवहारांवर मौन का?
या सगळ्या प्रकारांमुळे महावितरणच्या निर्णय प्रक्रियेवर आणि निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
यंत्रणेवरचा विश्वास डळमळीत
एकीकडे कोटींची थकबाकीदार वीजचोरी करत राहतात, तर दुसरीकडे गुन्हे गुप्त ठेवले जातात, अशा दुहेरी वागणुकीमुळे जनतेच्या मनात असंतोष वाढतोय.
‘नियम सर्वांसाठी समान’ ही संकल्पना केवळ पुस्तकात राहिली का?
महावितरणला उत्तरदायित्वाची जाणीव आहे का?
वाघोलीत जबाबदार अधिकाऱ्याची गरज
वाघोली महावितरण कार्यालयातील भोंगळ कारभाराविरोधात आता स्थानिक नागरिक बोलू लागले आहेत.
या विभागात एक जबाबदार, पारदर्शक आणि कार्यक्षम अधिकारी नेमण्याची गरज असल्याचं नागरिक स्पष्टपणे सांगत आहेत.