187 Views
दीडशे जणांना मोफत डिजिटल श्रवणयंत्रांचे वाटप.
![]()
पुणे : प्रतिनिधी
शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे, खडकवासलासह पुणे परिसरातील दीडशे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि गरजूंना यशवंतराव चव्हाण सेंटर, पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने मोफत डिजिटल श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अनिता इंगळे यांच्यासह सहयोगी संस्थांचे पदाधिकारी, डॉक्टर उपस्थित होते. अनिता इंगळे म्हणाल्या की, तज्ज्ञ डॉक्टरांकडून कानांची तपासणी करून डिजिटल श्रवणयंत्रे देण्यात आली आहेत, त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे.






